Antelopes Fighting : जामदरा घोटी शेतशिवारात रंगली दोन काळविटांची झुंज, पाहा Video

Antelopes Fighting : जामदरा घोटी शेतशिवारात रंगली दोन काळविटांची झुंज, पाहा Video
काळवीट

काळवीट (Antelope) माणसाला पाहताच पळून जातं. दोन काळवीट एकत्र आले, की त्यांच्यात चांगलंच युद्ध पाहायला मिळतं. असंच दृश्य वाशिम(Washim)मधल्या जामदरा घोटी शेत शिवारात पाहायला मिळालं. दोन काळवीटांची झुंज (Fighting) गावकऱ्यांनी यावेळी अनुभवली.

प्रदीप गरड

|

Jan 17, 2022 | 10:08 AM

वाशिम : अतिशय चपळ असलेलं काळवीट (Antelope) माणसाला पाहताच पळून जातं. दोन काळवीट एकत्र आले, की त्यांच्यात चांगलंच युद्ध पाहायला मिळतं. असंच दृश्य वाशिम(Washim)मधल्या जामदरा घोटी शेत शिवारात पाहायला मिळालं. दोन काळवीटांची झुंज (Fighting) गावकऱ्यांनी यावेळी अनुभवली. ही झुंज तिथं उपस्थित असणाऱ्या अनेकांनी आपल्या मोबाइलच्या कॅमेऱ्यात कैद केली.

तासाभराहून अधिक वेळ?

शिवारात काम करणारे शेतकरी तसेच आजूबाजूचे ग्रामस्थ त्याठिकाणी काम करत होते. त्यांना हा नजारा दिसल्यानंतर मग त्यांनीही आपले मोबाइल काढले आणि काळविटांच्या या झुंजीचं दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं. या दोन काळविटांमधलं आपसांतलं द्वंद्व सुरू होतं. तब्बल एक तासाहून अधिक काळ ही झुंज चालल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.

काळविटांविषयी…

काळवीट हे हरीण प्रामुख्यानं देशाच्या गवताळ भागात विशेषत: आढळून येतं. हे हरिणांच्या कुरंग कुळातला प्रमुख हरीण आहे. नर काळवीट हा काळ्या रंगाचा असून मादी ही भुऱ्या रंगाची असते. नरांना प्रामुख्यानं शिंगे असतात. मादांना शिंगं नसतात. माणसाला मात्र काळविट प्रचंड घाबरतात. दुरूनही मनुष्य दिसला तरी ते लांब पळतात. चपळ असल्यानं माणसालाही ती क्षणार्धात दिसेनाशी होतात.

रेहेकुरी इथं काळविटांचं अभयारण्य

काळविटांचा वावर मुख्यत्वे शुष्क प्रदेशातल्या ओसाड माळरानांवर असतो. महाराष्ट्रात विशेषत: पश्चिम महाराष्ट्रातल्या पर्जन्य छायेतल्या प्रदेशात यांचं वास्तव्य असतं. अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या रेहेकुरी इथं काळविटांचं अभयारण्य आहे. पुणे जिल्ह्यातल्या दुष्काळी दौंड, इंदापूर, शिरूर, बारामती तालुक्यात तसेच अहमदनगर व सोलापूर, वाशिम जिल्ह्यामध्ये ही हरणं दिसतात. शाकाहारी असलेली काळवीटं प्रचंड चपळ असतात.

UP Assembly Election 2022 : ‘मनिके मागे हिते’च बीजेपी व्हर्जन ऐकलं का? सोशल मीडियावर Video होतोय Viral

चिते की चाल, बाज की नजर और ‘हरिणाच्या उडीवर’ संदेह नहीं करते! Video पाहून बाजीरावपण हेच म्हणाले असते

Viral Video of Father-Son : वडिल-मुलाचा अनोखा खेळ, तुम्हालाही हसू आल्याशिवाय राहणार नाही

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें