सब पवित्र कर देंगेः गोदावरीचे पाणी होणार आता अतिशुद्ध; नाशिकमध्ये ओझोनायझेशन प्लांट, रामकुंड तपोवनात उभारणी

मलनिस्सारण केंद्राचे आधुनिकीकरण करण्याचा विचारही महापालिका करत आहे. त्यानुसार आगरटाकळी केंद्राचे आधुनिकीकरण करण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल पालिकेने पर्यावरण विभागाकडे पाठवला आहे.

सब पवित्र कर देंगेः गोदावरीचे पाणी होणार आता अतिशुद्ध; नाशिकमध्ये ओझोनायझेशन प्लांट, रामकुंड तपोवनात उभारणी
नाशिकमधील गोदाकाठ.
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 10:30 AM

नाशिकः गोदावरीचे पाणी अतिशुद्ध करण्याचा चंग महापालिका प्रशासनाने बांधला असून, त्यासाठी आता रामकुंड आणि तपोवनात ओझोनायझेशन प्लांटची उभारणी केली जाणार आहे. याबाबतचा डीपीआर म्हणजे सविस्तर प्रकल्प अहवाल महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी नागपूरच्या ओझोन रिसर्च अॅण्ड अॅप्लिकेशन प्रा. लि. कंपनीकडून मागवला आहे.

गोदावरची दक्षिण गंगा ही ख्याती. देशभरातील अनेक भाविक नाशिकला येतात. येथे कुंभमेळ्याचे आयोजन होते. प्रभू रामचंद्रापासून ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी. मात्र, या गोदामायला प्रदूषणाचे ग्रहण लागले आहे. विशेषतः महाालिका क्षेत्रातील 11 किलोमीटरचे पात्र प्रदूषित होत आहे. त्यामुळे मोठ्या आस्थेने आलेले भाविक जेव्हा या पवित्र गंगेमध्ये स्नानासाठी उतरतात तेव्हा आपसुकच त्यांच्या चेहऱ्यावर आट्यांचे जाळे पसरते. इथल्या गोदा प्रदूषणाची चर्चा मग सर्वदूर होते. हे सारे टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. त्यातूनच गोदावरीमध्ये ओझोनायझेशन प्लांट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गोदापात्रात सोडले जाणारे पाणी अतिशुद्ध करून सोडण्याचा विचार आहे.

प्लांटने होणार काय?

खरे तर नाशिकमध्ये सांडपाणी थेट गोदापात्रात सोडले जात नाही. ते भुयारी गटार योजनेमार्फत मलनिस्सारण केंद्रात आणले जाते. तिथे या पाण्यावर प्रक्रिया करून ते गोदावरीत सोडले जाते. मात्र, त्यानंतरही या पाण्यात काही घातक घटक कायम रहात आहेत. त्यामुळे ओझोनायझेशनच्या माध्यमातून पाण्यातील बीओडी अर्थातच बायोमेडिकल ऑक्सिन डिमांड हा दहा आत ठेवला जाणार आहे. पहिल्यांदा रामकुंड भागात आणि पुन्हा तपोवनमध्ये हा प्लांट सुरू केला जाणार आहे. यात यश आले, तर गोदावरी प्रदूषणातून मुक्त होईल, अशी आशा आहे.

मलनिस्सारण केंद्रांचे आधुनिकीकरण

मलनिस्सारण केंद्राचे आधुनिकीकरण करण्याचा विचारही महापालिका करत आहे. त्यानुसार आगरटाकळी केंद्राचे आधुनिकीकरण करण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल पालिकेने पर्यावरण विभागाकडे पाठवला आहे. चेहेडी आणि पंचक येथील मलनिस्सारण केंद्राच्या आधुनिकीकरणासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करा, अशा सूचनाही महापालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. (Water from Godavari river to be purified in Nashik, construction of ozonation plant at Ramkund Tapovan)

इतर बातम्याः

प्रारूप मतदारयादी जाहीर, नाशिक जिल्ह्यात 45 लाख 50 हजार मतदार; 5 जानेवारी रोजी अंतिम यादी होणार प्रसिद्ध

कोणताही शत्रू शुद्र नसतो, पंकजांचे नाशिकमध्ये सूचक वक्तव्य, त्यांच्या मनात सल आहे तरी काय?

Nashik weather: उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका दिवाळीनंतरच; दक्षिण महाराष्ट्रात मात्र ऐन दिवाळीत धारानृत्य!

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.