AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडीची कारवाई राजकीय हेतूने, आम्ही कुणालाही घाबरत नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली असून त्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. (we are not afraid of probe aaditya thackeray over ed summons)

ईडीची कारवाई राजकीय हेतूने, आम्ही कुणालाही घाबरत नाही; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
aaditya thackeray
| Updated on: Dec 28, 2020 | 1:25 PM
Share

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस पाठवली असून त्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असून महाविकास आघाडी कुणालाही घाबरत नाही, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला आहे. (we are not afraid of probe aaditya thackeray over ed summons)

आदित्य ठाकरे यांनी आज मुंबईतील रस्ते कामांची पाहणी केली. त्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधताना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ईडीची नोटीस राजकीय हेतूने प्रेरित आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. राजकीय आकसापोटील या नोटीसा पाठवल्या जात आहेत. हे सर्व राजकीय आहे. महाविकास आघाडी त्याला घाबरत नाही. महाविकास आघाडी घट्ट आणि मजबूत आहे, असं सांगतानाच आम्ही देश आणि महाराष्ट्रासाठी काम करत असून आमचं काम सुरूच ठेवणार असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.

कोण काय म्हणालं?

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी टीका केली आहे. ईडीच्या नोटीसमध्ये काहीच नवीन नाही. भारतात अनेकांना ईडीच्या नोटीस येतात. हे आता स्वस्त झालंय. ईडीची नोटीस येणं याचं कुणालाही वाईट वाटत नाही. कारण आजकाल कुणालाही नोटीस बाजवली जाते, मग त्या व्यक्तीचा संबंध असो वा नसो, असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी लगावला. ईडीच्या नोटीसला गांभीर्यानं घेण्याची गरज नाही. कुणी चुकीचं केलं तर बाहेर येईल. यात राजकारण आहे का हे ही त्यामुळे दिसून येईल, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

तर, जो भाजपच्या विरोधात बोलेल किंवा त्यांच्या धोरणाविरोधात बोलेल त्याच्या मागे ईडी किंवा सीबीआयची चौकशी लावली जाते. या यंत्रणांचा राजकीय वापर होत असल्यानेच आम्ही सीबीआयबाबत निर्णय घेतला. सीबीआय आमच्या परवानगी शिवाय महाराष्ट्रात येऊ शकत नाही. सीबीआयला राज्यात प्रवेश द्यायचा की नाही हा आमचा अधिकार आहे, असं सांगतानाच ईडीचा असा राजकीय वापर होणं दुर्देवी आहे. महाराष्ट्रात अशा पद्धतीचं राजकारण कधीच पाहिलं नाही, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. (we are not afraid of probe aaditya thackeray over ed summons)

अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना समन्स बजावले आहे. पीएमसी बँक घोटाळ्या प्रकरणी चौकशीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना नोटीस बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीने वर्षा यांना 29 डिसेंबर रोडी ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. (we are not afraid of probe aaditya thackeray over ed summons)

संबंधित बातम्या:

भाजपाला विरोध केला की ईडी मागे लागणारच? सहा नेते, सेम स्टोरी; वाचा स्पेशल रिपोर्ट

संजय राऊतांच्या पत्नीला PMC बँक घोटाळ्या प्रकरणी ईडीचे समन्स का? नेमकं प्रकरण काय?

ईडीची नोटीस येणं स्वस्त झालंय, आजकाल कुणालाही नोटीस बजावल्या जातात; प्रफुल्ल पटेल यांचा टोला

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.