AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jayant Patil : सारखं भाजपसोबत जाणार का? अर्थमंत्री होणार का? या प्रश्नांवर जयंत पाटलांनी मोजक्या शब्दात विषयच संपवून टाकला

Jayant Patil : शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि जयंत पाटील यांच्याबद्दल सुरु असलेल्या चर्चा, तर्क-वितर्क थांबलेले नाहीत. आज पंढरपूर दौऱ्यावर आलेल्या जयंत पाटील यांनी मोजक्या शब्दात हा विषय संपवला.

Jayant Patil : सारखं भाजपसोबत जाणार का? अर्थमंत्री होणार का? या प्रश्नांवर जयंत पाटलांनी मोजक्या शब्दात विषयच संपवून टाकला
Jayant Patil
| Updated on: Jul 18, 2026 | 2:08 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बडे नेते जयंत पाटील यांनी या आठवड्यात वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी तिथे सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल हजर होते. त्यानंतर जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी जितेंद्र आव्हाड सोबत होते. या सगळ्या घटनाक्रमामुळे शरद पवार यांचा पक्ष भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये सहभागी होणार, जयंत पाटील महाराष्ट्राचे पुढचे उपमुख्यमंत्री अशा चर्चा सुरु झाल्या. त्यावर जयंत पाटील यांनी खुलासा सुद्धा केला. “मी मुख्यमंत्र्यांना माझ्या मतदारसंघातील ईश्वरपूर नगराध्यक्षाला चुकीच्या पद्धतीने अपात्र ठरवलय हे सांगण्यासाठी भेटलो. माझी तिथे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याशी भेट झाली नाही” असा खुलासा केला.

तरीही राज्याच्या राजकारणात शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि जयंत पाटील यांच्याबद्दल सुरु असलेल्या चर्चा, तर्क-वितर्क थांबलेले नाहीत. आज पंढरपूर दौऱ्यावर आलेल्या जयंत पाटील यांनी मोजक्या शब्दात हा विषय संपवला. जयंत पाटील यांनी एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. “एनडीएकडून आम्हाला कोणतेही निमंत्रण आलेले नाही. त्यामुळे तिकडे जाण्याचा प्रश्नच नाही. माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांमधून आमची केवळ करमणूक होत आहे” असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं.

तीन वेळा अर्थमंत्रीपदाची शपथ घेतल्यासारखं वाटलं

अर्थमंत्रीपदाच्या चर्चांवर मिश्कील टिप्पणी करत, “माध्यमांमुळे मी तीन दिवसांत तीन वेळा अर्थमंत्रीपदाची शपथ घेतल्यासारखं वाटलं,” असे ते म्हणाले. “महायुतीत जाण्याच्या चर्चाही त्यांनी फेटाळून लावल्या. आमचे आमदार शरद पवार यांच्यासोबत निष्ठेने आहेत आणि पुढेही राहतील,” असं स्पष्ट केलं. शक्तीपीठ विरोधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज पंढरपुरात आले असताना जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही भूमिका मांडली.

जयंत पाटील यांच्याकडे अर्थखातं संभाळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यात 15 वर्ष सरकार होतं. त्यावेळी त्यांनी अर्थखात्याची जबाबदारी संभाळलेली. एक हुशार, अनुभवी नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...