आम्ही भाजपच्या चौकशीची मागणी केली; सेलिब्रिटींची नाही: सचिन सावंत

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटच्या चौकशीचे आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली आहे (we demand bjp's enquiry not celebrities says sachin sawant)

आम्ही भाजपच्या चौकशीची मागणी केली; सेलिब्रिटींची नाही: सचिन सावंत
सचिन सावंत, काँग्रेस नेते
Follow us
| Updated on: Feb 08, 2021 | 7:10 PM

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सेलिब्रिटींच्या ट्विटच्या चौकशीचे आदेश दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. या मुद्द्यावरून भाजपने आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आम्ही भाजपच्या चौकशीची मागणी केली आहे. सेलिब्रिटींच्या ट्विटची नाही. भाजपची चौकशी केल्यावर सेलिब्रिटींवर कुणाचा दबाव तर नाही ना हे दिसून येईल, असं काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. (we demand bjp’s enquiry not celebrities says sachin sawant)

सचिन सावंत यांच्यासह काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मिटींग घेतली होती. त्यात शेतकरी आंदोलनावरून सेलिब्रिटींनी केलेले ट्विट एकसारखे असल्याने सेलिब्रिटी कुणाच्या दबावात तर नाही ना? याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली होती. त्यावर देशमुख यांनी या चौकशीचे आदेश दिले होते. मात्र, भाजपने यावरून आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. त्यावर सचिन सावंत यांनी तीन ट्विट करून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपपासून सेलिब्रिटींना संरक्षण मिळावे

भारतीय जनता पक्ष जाणिवपूर्वक आम्ही केलेल्या मागणीचा विपर्यास करून बोंब ठोकत आहे. आम्ही भाजपाची चौकशी करावी अशी मागणी केली आहे, सेलिब्रिटींची नाही. उलट सेलिब्रिटींना भाजपापासून संरक्षण द्यावे ही मागणी केली आहे. देशपातळीवर भाजपाकडून लोकशाही मानक पायदळी तुडवले जात आहेत, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रीय हिरोंना निर्धास्तपणे मते मांडता यावीत

काही सेलिब्रिटींवर भाजपा दबाव आणून ट्विट करावयास भाग पाडू शकतो. काही सेलिब्रिटींच्या ट्विटमध्ये Amicable हा शब्द समान आहे. सायना नेहवाल आणि अक्षय कुमार यांचे ट्विट एकाच शब्दात आहेत. सुनील शेट्टीने आपल्या ट्विटरला भाजपा पदाधिकारी हितेश जैन याला टॅग केले आहे. यातून भाजपा कनेक्शन दिसते. अनेक जणांनी याअगोदर राजकीय ट्विट कधीच केलं नाही. त्यामुळे त्यांना दबाव आणून भाग पाडले जात आहे का? याची चौकशी आम्ही मागितली आहे. आमच्या विरोधातही कोणतीही भीती न बाळगता त्यांना बोलता आले पाहिजे. पण जर भाजपाची भीती असेल तर ती दूर झाली पाहिजे. लतादीदी आणि सचिन तेंडुलकर हे भारतरत्न समाजातील आदर्श आहेत. त्यामुळे त्यांनी व्यक्त केलेल्या मत हे महत्त्वाचे व त्यांचे असेल. पण इतरांचे काय? भाजपा हुकूमशाही मानणारा पक्ष आहे हे विसरता कामा नये. राष्ट्रीय हिरोंना निर्धास्तपणे आपले मत मांडता यावेत म्हणून भाजपाची चौकशी झाली पाहिजे, असंही सावंत यांनी म्हटलं आहे.

भाजप नेत्यांनी दबाव आणला का?

तर गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही ट्विट करून याबाबतची माहिती दिली आहे. भारतरत्नाने सन्मानित केलेल्या व्यक्ती आमच्या सगळ्यांसाठी सन्माननीय आहेत.पण त्यांच्यावर कोणत्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दबाव टाकला का? त्या नेत्याची चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे, असं देशमुख यांनी त्यांच्या ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे. (we demand bjp’s enquiry not celebrities says sachin sawant)

संबंधित बातम्या:

काँग्रेसचीही ‘सोशल मीडिया वॉरियर्स टीम’ची घोषणा; केंद्रातील मोदी सरकारला टक्कर देणार?

लता मंगशेकर, सचिन तेंडुलकर, सायनाच्या ट्विटची चौकशी होणार; देशमुखांकडून सेलिब्रिटी ट्विटच्या चौकशीचे आदेश

शेतकऱ्यांच्या खात्यात 15 लाख आले का? अजित पवारांचा मोदी सरकारला सवाल

(we demand bjp’s enquiry not celebrities says sachin sawant)

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.