AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Panjabrao Dakhs Rain Forecast : पावसाचा जोर वाढणार, पुढील काही तासांमध्ये मुसळधार पाऊस, पंजाबराव डख यांचा अंदाज

पुढील काही दिवसांमध्ये राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असून, पाऊस महाराष्ट्राला झोडपून काढणार आहे. आता या पार्श्वभूमीवर हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा नवा मान्सून अंदाज समोर आला आहे.

Panjabrao Dakhs Rain Forecast : पावसाचा जोर वाढणार, पुढील काही तासांमध्ये मुसळधार पाऊस, पंजाबराव डख यांचा अंदाज
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 26, 2026 | 10:06 PM
Share

22 जूनपासून राज्यात पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, आनंदाचं वातावरण आहे. कारण आता मान्सूनच्या या पावसामुळे पेरण्यांना वेग येणार आहे. दरम्यान भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार 27 जूनपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. 27 जून पासून 1 जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेजं अलर्ट तर काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीच्या भागामध्ये उद्यापासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान या पार्श्वभूमीवर आता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज देखील समोर आला आहे.

नेमका काय आहे हवामान अंदाज?

25 जुनपर्यंत राज्यातील विविध भागांमध्ये खूप पाऊस झाला. नदी नाल्यांना पूर आले. मुक्ताईनगर, परभणी जिल्हा, अकोला, बुलढाणा, अमरावती जिल्हा, मुंबई सह कोकणात जोरदार पाऊस झाला. मात्र ज्या भागात अजून पाऊस पडला नाही, त्या शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही. कारण 26 जूनपासून म्हणजे आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. 26 जून पासून ते 1 जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोरदार पाऊस पडणार आहे. पुढील काही दिवसांमध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ कोकण किनारपट्टी, घाट माथा या भागात जोरदार पाऊस होणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये मुंबई, पुण्यासह उत्तर महाराष्ट्रात अतिवृष्टीची शक्यता आहे. 2 जुलैपासून ते 6 जुलैपर्यंत राज्यातील काही भागामध्ये इतका पाऊस होईल की यापूर्वी इतका पाऊस कधीही पाहिला नसेल, असा अंदाज हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे.

परतीचा पाऊस जोरात 

दरम्यान हवामान विभागाकडून असं सांगण्यात आलं आहे की, यंदा पावसावर अल निनोचं सावट आहे, त्यामुळे पावसाचं प्रमाण कमी -कमी होत जाईल, परंतु पंजाबराव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदा परतीचा पाऊस जोरात होणार असून, त्यामुळे खरीप आणि रब्बी अशी दोन्ही हंगामातील पिके चांगली येतील.

Follow Us
ढोल-ताशांचा निनाद अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य
Pune Ganpati Visarjan : ढोल-ताशांचा निनाद, गुलालाची उधळण अन्... पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीचं ड्रोन दृश्य पाहून डोळेच दिपतील
लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
Lalbaugcha Raja Aarti : लालबागच्या राजाची मंडपातील शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई...
Ganpati Visarjan 2026 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! जयघोषाने दुमदुमली मुंबई; भाविकांचा निरोपाचा भावूक क्षण
शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा...
Chintamani Ganpati : शेवटची आरती अन् डोळ्यांत अश्रू; चिंचपोकळीच्या चिंतामणीला भाविकांचा भावूक निरोप
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : मुंबईच्या गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनासाठी चोख सुरक्षा आणि सुविधांची व्यवस्था
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
Video : दगडूशेठ गणपती विसर्जन, पारंपरिक चेंडा वादनाने उत्सव खास
गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
Video : गणपती विसर्जन मिरवणूक... मुंबईच्या परळचा राजा तेजुकायाची भव्य मिरवणूक
पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
Video: पुणे गणेश विसर्जन, मानाचा पहिला कसबा गणपती मिरवणुकीसाठी मार्गस्थ
लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ
Mumbai Ganpati Visarjan 2026 | लालबाग, परळ नगरीत बाप्पाला निरोप देण्याची वेळ; गणपती विसर्जन मिरवणुकीची तयारी
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम