AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या विकेण्डला पश्चिम रेल्वेने प्रवास करताना सावधान, 334 फेऱ्या होणार रद्द, वांद्रे गर्डरसाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवार तीन रात्री ब्लॉक

एकूण 132 अधिक 202 अशा ( अप आणि डाऊन मार्ग ) 334 लोकल रद्द होतील. पण आम्ही एक्स्ट्रा 110 फेऱ्या प्रवाशांसाठी चालविणार आहोत. त्यामुळे प्रत्यक्षात केवळ 200 नियमित फेऱ्या रद्द होतील असे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क विनीत अभिषेक यांनी सांगितले.

या विकेण्डला पश्चिम रेल्वेने प्रवास करताना सावधान, 334 फेऱ्या होणार रद्द, वांद्रे गर्डरसाठी शुक्रवार, शनिवार आणि रविवार तीन रात्री ब्लॉक
Updated on: Apr 11, 2025 | 6:00 PM
Share

या विकेण्डला पश्चिम रेल्वेच्या लोकलने प्रवास करण्याचा विचार करीत आहात तर सावधान. कारण माहिम आणि वांद्रे दरम्यान रिगर्डरींगच्या कामासाठी 11,12,13 एप्रिल रोजी सलग तीन दिवस रात्री 11 ते सकाळी 8.30 वाजेपर्यंत पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे तब्बल 334 लोकल रद्द केल्या जाणार आहेत. त्यामुळे लोकलला गर्दी होण्याची शक्यता आहे. पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवा थेट सोमवारी 14 एप्रिल रोजी सोमवारीच सुरळीत होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांचे हाल होणार आहेत. या दरम्यान, 334 उपनगरीय लोकल रद्द होणार आहेत. तसेच लांबपल्ल्याच्या गाड्यांवरही परिणाम होणार आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहीतीनुसार माहीम आणि वांद्रे स्थानाकांदरम्यानच्या ब्रिज क्र.20 च्या रिगर्डरिंगसाठी महत्वाचा 9.30 तासांचे नाईट ब्लॉक 11 एप्रिल ( शुक्रवार रात्री), आणि 12 एप्रिल ( शनिवारी रात्री ) रोजी घेतले जातील. 11 एप्रिल रोजीचा नाईट ब्लॉक रात्री 11 वाजता सुरु होईल तो सकाळी 8.30 वाजेपर्यत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर असेल आणि रात्री 12.30 ते सकाळी 6.30 दरम्यान डाऊन जलद मार्गावर असेल. 12 एप्रिल रोजी रात्री 11.30 ते सकाळी 9वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि डाऊन जलद मार्गावर रात्री 11.30 ते सकाळी 8 वाजेपर्यंत अप जलद मार्गावर असणार आहे.

11/12 एप्रिल, 2025 (शुक्रवार/शनिवार) परीणाम होणाऱ्या लोकल ट्रेन

· शुक्रवारी 10:23 वाजल्यापासून ते रात्री 11:58 वाजल्यानंतर चर्चगेटवरुन सुटणाऱ्या सर्व धीम्या लोकल मुंबई सेंट्रल आणि सांताक्रुज दरम्यान फास्ट लाईनवर चालविण्या जातील त्यामुळे महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्टेशनांवर त्या थांबणार नाहीत.

· याच प्रकारे विरार, भाईंदर आणि बोरीवलीवरुन सुटणाऱ्या काही धीम्या ट्रेन सांताक्रुझ आणि मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर चालविल्या जातील. त्यामुळे खार रोड, माहिम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ आणि महालक्ष्मी स्थानकांवर त्या थांबणार नाहीत.

· शुक्रवारी चर्चगेटहून शेवटची धीमी ट्रेन रात्री 10:23 वाजता भाईंदरसाठी रवाना होईल

· शुक्रवारी चर्चगेटहून अखेरची जलद लोकल रात्री 11:40 वाजता विरारसाठी रवाना होईल

· चर्चगेटहून रात्री 11:58 वाजता विरारसाठी रवाना होणाऱ्या लोकल ट्रेन मुंबई सेंट्रल आणि सांताक्रुझ दरम्यान फास्ट लाईनवर चालविल्या जातील. म्हणून त्या महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्टेशनला थांबणार नाही.

· शुक्रवारी बोरीवलीहून शेवटची स्लो फेरी रात्री 10:15 वा.चर्चगेटसाठी रवाना होईल. ही ट्रेन रवाना झाल्यानंतर, ब्लॉक अवधीत उर्वरित ट्रेन सांताक्रुझ आणि मुंबई सेंट्रल दरम्यान फास्ट लाईनवर धावतील. त्यामुळे त्या खार रोड, माहिम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ आणि महालक्ष्मी स्थानकात थांबा घेणार नाही.

· शुक्रवारी विरारहून शेवटची लोकल ट्रेन रात्री 12:05 वाजता चर्चगेटसाठी रवाना होईल.

· ब्लॉक काळात, चर्चगेट आणि दादर दरम्यान लोकल ट्रेन फास्ट लाईनवर धावतील.

· ब्लॉककाळात गोरेगांव आणि वांद्रे दरम्यान लोकल ट्रेन हार्बर मार्गावर चालविल्या जातील.

· विरार आणि अंधेरी दरम्यान लोकल ट्रेन धीमी आणि जलद दोन्ही मार्गावर चालवल्या जातील.

· शनिवारी विरारहून चर्चगेटसाठी पहिली लोकल ट्रेन सकाळी 05:47 वाजता रवाना होईल.

·  शनिवारी, भाईंदर ते चर्चगेट ही पहिली स्लो लोकल सेवा सकाळी ६:१० वाजता सुटेल आणि सांताक्रूझ आणि मुंबई सेंट्रल दरम्यान जलद मार्गावर धावेल, त्यामुळे ती खार रोड, माहिम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परेल आणि महालक्ष्मी स्थानकांवर थांबणार नाही.

· शनिवारी, बोरिवली ते चर्चगेट ही पहिली स्लो लोकल सेवा सकाळी ०८:०३ वाजता सुटेल.

· चर्चगेटहून पहिली जलद लोकल सकाळी ६:१४ वाजता बोरिवलीला रवाना होईल आणि मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझ दरम्यान जलद मार्गावर धावेल आणि त्यामुळे महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकांवर थांबणार नाही.

· चर्चगेट ते विरार पहिली जलद लोकल सकाळी ६:१५ वाजता सुटेल.

· चर्चगेटहून बोरिवलीला जाणारी पहिली स्लो लोकल सकाळी ८:०३ वाजता सुटेल.

१२/१३ एप्रिल २०२५ (शनिवार/रविवार) रोजी उपनगरीय लोकलवर परिणाम –

• ब्लॉक कालावधीत, चर्चगेट आणि दादर दरम्यानच्या फेऱ्या जलद मार्गावर धावतील.

• ब्लॉक कालावधीत, शनिवारी रात्री/रविवारी सकाळी, डहाणू रोड, विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर आणि बोरिवली येथून सुटणाऱ्या सर्व अप लोकल फेऱ्याय अंधेरीपर्यंतच धावतील.

• गोरेगाव आणि वांद्रे/माहिम दरम्यानच्या फेऱ्या हार्बर मार्गावर चालवल्या जातील.

• शनिवारी चर्चगेट ते विरार पर्यंतची शेवटची धीमी लोकल रात्री 10:53 वाजता सुटेल.

• शनिवारी चर्चगेट ते विरारपर्यंतची शेवटची फास्ट लोकल रात्री  11:05  वाजता सुटेल.

• शनिवारी, माहिमहून शेवटची हार्बर लाईन लोकल गोरेगावसाठी रात्री 12:11 वाजता सुटेल (सीएसएमटी प्रस्थान: २३:४६ वाजता).

• शनिवारी वांद्रे ते विरार ही शेवटची लोकल  रात्री 01 :30 वाजता सुटेल.

• शनिवारी बोरिवली ते चर्चगेट ही शेवटची धीमी लोकल रात्री  10 :49  वाजता सुटेल.

• शनिवारी विरारहून चर्चगेटला जाणारी शेवटची जलद लोकल 10:24  वाजता सुटेल.

• शनिवारी विरारहून वांद्रेला जाणारी शेवटची लोकल ट्रेन रात्री  12:05  वाजता सुटेल.

• ब्लॉक कालावधीत, चर्चगेट आणि दादर दरम्यान जलद मार्गावर लोकल ट्रेन चालवल्या जातील.

• ब्लॉक कालावधीत, गोरेगाव आणि वांद्रे दरम्यान हार्बर मार्गावर लोकल ट्रेन सेवा चालवल्या जातील.

• विरार आणि अंधेरी दरम्यान लोकल ट्रेन सेवा धीम्या आणि जलद मार्गांवर चालवल्या जातील.

• रविवारी, विरार ते चर्चगेट पहिली स्लो लोकल सकाळी 08:08 वाजता सुटेल.

• रविवारी, भाईंदरहून चर्चगेटला जाणारी पहिली लोकल ट्रेन (एसी सेवा) सकाळी 08:24 वाजता सुटेल.

• रविवारी, वसई रोड ते चर्चगेट अशी पहिली लोकल सेवा सकाळी 08:14 वाजता सुटेल. ही ट्रेन अंधेरीपर्यंत धीमी  धावेल.

• विरार ते चर्चगेट पहिली जलद लोकल ट्रेन सकाळी 08:18  वाजता सुटेल.

• चर्चगेट ते विरार पहिली जलद लोकल ट्रेन सकाळी 09:03वाजता सुटेल.

• चर्चगेटहून बोरिवलीला जाणारी पहिली स्लो लोकल ट्रेन 09 :04 वाजता सुटेल.

मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका
मग ठाकरेंनी 'दोपहरचा सामना' बंद करावा; सदावर्तेंची ठाकरे बंधूंवर टीका.
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर
ठाकरेंची राजकीय कवायत! इगतपुरीत उद्यापासून मनसेचं शिबिर.
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न..
पंतप्रधान मोदींचा उज्ज्वल निकम यांना फोन, विचारला हा मोठा प्रश्न...
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्..
छत्रपती संभाजीराजेंचा एकेरी उल्लेख अन्...
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, काय आहे सध्याची परिस्थिती?.
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला
रिक्षा चालकांची मुजोरी वाढली; ठाण्यात महिलेवर हात उचलला.
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने
मद्यविक्री परवान्यांची खिरापत वाटणार? तब्बल 328 नवीन मद्यविक्री परवाने.
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल
प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचं काम 2027 पर्यंत होईल.
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला
पवार अंबानी-आदानींपेक्षा कमी नाही; अंजली दमानियांचा टोला.
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?
रायगडच्या समुद्रात पाकिस्तानच्या बोटीकडून मासेमारी?.