संघ म्हणजे नेमकं काय? मोहन भागवत यांनी एका वाक्यात अर्थ सांगितला
संघ म्हणजे काय? संघाचा अर्थ काय यावर स्पष्टीकरण देताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे, ते पुण्यामध्ये बोलत होते.

संघ म्हणजे काय? संघाचा अर्थ काय यावर स्पष्टीकरण देताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठं विधान केलं आहे. संघ म्हणजे काय? तर संघ म्हणजे आपलेपणा एवढे सरळ साधं संघाचे वर्णन आहे, संघ करतो काय तर हिंदूंचं संघटन, आपण एकाच तत्वाचे आहोत म्हणजे आपले आहोत, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. ते पुण्यामध्ये बोलत होते.
नेमकं काय म्हणाले भागवत?
मनुष्याला बुद्धी दिलेली आहे, तो विचार करतो आणि त्याच्यामुळे तो आहे त्याच्यापेक्षाही चांगला होऊ शकतो. बुद्धी उलटी चालवली तर आहे त्याच्यापेक्षा वाईटही होऊ शकतो, तो वाईट होत नाही याचं कारण त्याला आपलेपणा जाणवतो. संघ काय काम करतो? समाजाला आपलेपणाचा विसर पडत चाललेला आहे, त्याची आठवण संघ करून देतो, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, स्वामी सेवकाचं काम काय शक्यतो संस्कार बंद करायचे आणि आपल्या संपर्कात येणाऱ्याची निस्वार्थ बुद्धीने सेवा करायची आणि सेवा सर्व शक्तीनिशी करायची, आजकाल मधून -मधून लोक इंग्रजीत बोलतात, लोकांना इंग्रजीत बोलायची जास्त सवय आहे, इंग्रजीत बोललं म्हणजे काहीतरी पहिल्यांदाच सांगतो आहे, असं वाटतं. म्हणून गिव्हिंग बॅक असा शब्दप्रयोग करतात, गिव्हिंग बॅक हे इंग्रजी शब्द आता आले, आपल्याकडे फार पूर्वीपासून आहेत, हा आपलेपणा ओळखायचा हे जीवनाचे एक कर्तव्य आहे ,आणि आपलेपणा ओळखून आपलेपणाने वागायचं हे दुसरं कर्तव्य आहे.
आम्ही संघात असंच करतो, ही गोष्ट व्हायला पाहिजे. चार स्वयंसेवक विचार करतात विचार करायला सुरुवात करतात ही सगळी कामं उभी राहिलेली आहेत, ही काम संघाच्या बैठकीत ठरवून उभी राहिलेली नाहीत, ज्या ज्या वेळेला स्वयंसेवकांना जाणवलं त्या त्या वेळेला त्यांनी काम सुरू केलं. जे दीर्घकालीन काम आहे, हे चालू शकतं त्यांना मदतीची आवश्यकता आहे, मग संघटना त्यासाठी मदत करते, असं यावेळी मोहन भागवत यांनी म्हटलं आहे.
