AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Khavdya Dongar Case : संभाजीनगरातल्या खवड्या डोंगराचं रहस्य काय? ‘खवड्या’ असं नाव का पडलं? वाचून धक्काच बसेल!

हा डोंगर ज्या परिसरात आहे, तो भाग खडकाळ आहे. दगड, मुरूम काढण्यासाठीही अनेकजण येथे अवैध पद्धतीने उत्खनन करतात. म्हणूनच हा डोंगर खडकाळ, खवखवित, खड्डे असलेला झाला.

Khavdya Dongar Case : संभाजीनगरातल्या खवड्या डोंगराचं रहस्य काय? 'खवड्या' असं नाव का पडलं? वाचून धक्काच बसेल!
khavdya dongar nameImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 23, 2026 | 4:54 PM
Share

Khavdya Dongar : छत्रपती संभाजीनगरात चांदगुडे कुटुंबासोबत धक्कादायक घटना घडली. घरातील अंतर्गत कलहामुळे मुलगा कुणाल चांदगुडे, मुरलीधर चांदगुडे, संगीता चांदगुडे यांचा मृत्यू झाला आहे. कुणालने वडील मुरलीधर चांदुगडे यांना घेऊन खवड्या डोंगरावरून उडी घेतली. तर मुलगा आणि पतीने उडी घेतल्याचे दिसताच संगीता चांदगुडे यांनीही याच खवड्या डोंगरावरून उडी घेत स्वत:ला संपवलं. या घटनेचा प्रसंग लोकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. अवघ्या तीन सेकंदांत तिघांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला. सगळीकडे एकच खळबळ उडाली. अगोदर आयफोनच्या ईएमआयमुळे कुणाल आणि वडील मुरलीधर चांदगुडे यांच्यात वाद होता, असे बोलले जात होते. परंतु आता या मृत्यूकांडाला कुटुंबातील अंतर्गत वादाची किनार असल्याचे बोलले जात आहे. ही घटना समोर आल्यानंतर छत्रपती संभाजीनगराली खवड्या डोंगरही तेवढाच चर्चेत आला आहे. खवड्या डोंगरावर असं काय आहे? त्याचं नाव खवड्या डोंगर असं का पडलं असावं? असं विचारलं जातंय.

खवड्या डोंगर नेमका कुठे आहे?

मिळालेल्या माहितीनुसार खवड्या डोंगर हा छत्रपती संभाजीनगरातील बजाज नगर या परिसरात आहे. तिसगाव-वाळूज एमआयडीसी परिसरात हा डोंगर आहे. बांधकामासाठी दगड, विकासकामे यामुळे हा डोंगर बराच पोखरण्यात आला आहे. डोंगर पोखरताना त्याच्यावर खवले तयार झालेले आहेत. दुरूनच डोंगरातील दगडावर खवले दिसतात. त्यामुळे या डोंगराला खवल्या डोंगर असेही काहीजण म्हणतात. स्थानिक बोलीभाषेत या डोंगराला खवड्या डोंगर असे नाव पडले. म्हणूनच छत्रपती संभाजीनगरात हा डोंगर खवड्या डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. अवैध उत्खननामुळेही या योंगरावर सरळ कडे तयार झाले आहेत. या कड्यांवरून तोल गेला की थेट माणसाचा जीव जाऊ शकतो, एवढे भीषण कडे या डोंगराला तयार झालेले आहेत.

खवड्या डोंगर संभाजीनगरातील नवा डेथ पॉइंट

हा डोंगर ज्या परिसरात आहे, तो भाग खडकाळ आहे. दगड, मुरूम काढण्यासाठीही अनेकजण येथे अवैध पद्धतीने उत्खनन करतात. म्हणूनच हा डोंगर खडकाळ, खवखवित, खड्डे असलेला झाला. त्यामुळेच या डोंगराला खवड्या डोंगर असे नाव पडले असावे, असा अंदाज बांधला जातो. दरम्यान, हा खवड्या डोंगर संभाजीनगरातील नवा डेथ पॉइंट ठरला आहे. या डोंगरावरून आतापर्यंत 13 जणांची जीव संपवलेला आहे. म्हणूनच भविष्या अशा घटना घडू नयेत यासाठी खवड्या डोंगरावर उपायोजना करण्यात येणार आहेत.

Follow Us
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव...नाना पाटेकरांचा व्हिडीओ...
चेहऱ्यावर निखळ आनंद आणि साधे हावभाव... नाना पाटेकरांचा अखेरचा व्हिडीओ पाहून चाहत्यांचे डोळे पाणावले
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच...
नाना पाटेकर यांच्या निधनाने उद्धव ठाकरे भावुक; म्हणाले, 'विश्वासच बसत नाही की...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक...
नाना पाटेकरांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा; CM फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या...
नाना पाटेकरांच्या निधनाने सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, ‘सिनेसृष्टीतल ही पोकळी भरून निघणार नाही’
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते...
डॉक्टरांचं पथक घरी पोहोचलं तेव्हा नाना पाटेकर बेशुद्ध अवस्थेत होते; 45 सीपीआर दिला मात्र...  काय घडलं?
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला- सुप्रिया सुळे
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकून मोठा धक्का बसला, मी... सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?