AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha Reservation : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कधीपासून मिळणार? विखे पाटलांनी सगळं सांगितलं, म्हणाले…

राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात एक जीआर काढला आहे. या जीआरची अंमलबजाणी कधी होणार, याबाबत राधाकृष्ण विखे पाटील यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

Maratha Reservation : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कधीपासून मिळणार? विखे पाटलांनी सगळं सांगितलं, म्हणाले...
manoj jarange patil and radhakrishna vikhe patil
| Updated on: Sep 09, 2025 | 6:13 PM
Share

Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी मुंबईत दाखल होत केलेल्या उपोषणाची दखल घेऊन राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात निर्णय घेतला. या शासन निर्णयानंतर मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी असल्याचे प्रमाणपत्र मिळणार आहे आणि याच प्रमाणपत्राच्या मदतीने मराठा समाजाच्या संबंधित व्यक्तीला ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण मिळणार आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र सरकारच्या या निर्णयाचा थेट विरोध करत सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. असे असतानाच आता मंत्रिमंडळ उपसमितीने आजच्या (9 सप्टेंबर) बैठकीत सरकारने काढलेल्या जीआरविषयी चर्चा करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र कधी मिळेल? याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ते बैठकीनंतर माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

विखे पाटील यांची सरकारचा जीआर, भुजबळ यांच्यावर प्रतिक्रिया

राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीला उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील, मंत्री दादा भुसे, शिवेंद्रराजे भोसले तसेच समितीचे अन्य सदस्य उपस्थित होते. या बैठकीत मनोज जरांगे यांना दिलेली आश्वासनं आणि त्या आश्वासनांची पूर्तता यावर चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी बैठकीतील विषय तसेच मंत्री छगन भुजबळ यांची नाराजी यावर भाष्य केले. मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी दाखले देण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. तसेच या महिन्याच्या अखेरपर्यंत मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले जातील, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली आहे.

राधाकृष्ण विखे पाटील नेमकं काय म्हणाले?

मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीने तीन ते चार बैठका घेऊन अतिशय विचाराअंती मराठा समाजासाठी हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात निर्णय घेतलेला आहे. काही दिवसांपूर्वी मी छगन भुजबळ यांनी एक विनंती केलेली आहे. मी छगन भुजबळ यांच्याशी एकदा चर्चा करणार आहे. वास्तव काय आहे ते मी त्यांना सांगणार आहे, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली. तसेच अनेकवेळा फक्त ऐकीव माहितीवर मतं तयार होतात. आम्ही निश्चितपणे छगन भुजबळ यांचा गैरसमज दूर करू, असा विश्वास यावेळी विखे पाटील यांनी व्यक्त केला.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?