फडणवीस सरकारने मंजूर केलेले प्रकल्प कधी पूर्ण करणार; आमदार चव्हाण यांचा सवाल

कल्याण-डोंबिवलीतील कामांच्या श्रेयावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. (when will complete kalyan-dombivli's project?, Ravindra Chavan ask mahavikas aghadi)

फडणवीस सरकारने मंजूर केलेले प्रकल्प कधी पूर्ण करणार; आमदार चव्हाण यांचा सवाल
Ravindra Chavan

अमजद खान, टीव्ही9 मराठी, कल्याण: कल्याण-डोंबिवलीतील कामांच्या श्रेयावरून शिवसेना आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. कुणला कितीही पोस्टर लावू द्या, काम कोण करतंय हे सर्वांनाच माहीत आहे, असा टोला शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी लगावल्यानंतर त्याला भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस सरकारने कल्याण-डोंबिवलीसाठी प्रकल्प मंजूर केले होते. ते अर्धवट आहेत. हे प्रकल्प कधी पूर्ण करणार? असा सवाल रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. (when will complete kalyan-dombivli’s project?, Ravindra Chavan ask mahavikas aghadi)

खासदार श्रीकांत शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना-भाजपमधील पोस्टर वॉरवरून भाजपवर टीका केली होती. शिंदे यांची पत्रकार परिषद होत नाही तोच आमदार रवींद्र चव्हाण यांनीही शिवसेनेवर पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने कल्याण-डोंबिवलीसाठी अनेक प्रकल्प मंजूर केले होते. ते प्रकल्प अर्धवट आहेत. हे प्रकल्प कधी पूर्ण करणार ते सांगा?, असा सवाल चव्हाण यांनी केला. अधिकाऱ्यांच्या चालढकलपणामुळे हे प्रकल्प रेंगाळल्याचं सांगतानाच पालकमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

चव्हाण आक्रमक

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात अनेक प्रकल्प काही वर्षापासून सुरू आहेत. या प्रकल्पांचे काम कधी पूर्ण होणार? असा सवाल भाजपने केला आहे. रवींद्र चव्हाण हे काही दिवसापासून शिवसेना नेत्यांसह प्रशासनाला टीकेचे लक्ष्य करीत आहेत. घनकचरा व्यवस्थापन कर रद्द करा, शास्त्रीनगगरमध्ये शवविच्छेदन गृह सुरू करा आदी मागण्या त्यांनी यापूर्वी केल्या आहेत. आत्ता महापालिकेतील रखडलेल्या प्रकल्पाविषयी त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

11 प्रकल्प रखडले

डोंबिवलीतील मोठागाव, ठाकूर्ली, माणकोली पूलाचे काम, कल्याण शिळ रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटिकरणाचे काम, रिंग रोडचे काम, ऐरोली-काटई भुयारी मार्गाचे काम, कल्याण-तळोजा मेट्रोचे काम, कल्याण-ठाणे मेट्रोचे काम आणि केडीएमसीमधील रखडलेल्या रस्त्यांची कामे आदी 11 प्रकल्प रखडले आहेत. हे काम कधी पूर्ण होणार? यातील रिंग रोडचे काम रडतखडत सुरू आहे. आयुक्तांच्या निष्काळजीपणामुळे या प्रकल्पाची किंमत तिप्पट झाली आहे. याकडे पालकमंत्र्यांनी लवकर लक्ष द्यावे, अशी मागणी चव्हाण यांनी केली आहे. (when will complete kalyan-dombivli’s project?, Ravindra Chavan ask mahavikas aghadi)

 

संबंधित बातम्या:

कुणाला कितीही पोस्टर लावू द्या, कोण काम करतंय हे सगळ्यांनाच माहीत; श्रीकांत शिंदेंचा भाजपला टोला

केडीएमसीत पोस्टर बॉय विरुद्ध गल्ली बॉय; शिवसेना-भाजपमधील वाद पेटला

मुंडे साहेबांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला एक स्वप्न पूर्ण, ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी 82 वसतिगृहे मंजूर: धनंजय मुंडे

(when will complete kalyan-dombivli’s project?, Ravindra Chavan ask mahavikas aghadi)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI