AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना, पक्ष अन् चिन्हाचा निकाल कधी लागणार? असीम सरोदेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

आज सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? यावर सुनावणी पार पडली. यावर आता ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

शिवसेना, पक्ष अन् चिन्हाचा निकाल कधी लागणार? असीम सरोदेंची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
Asim SarodeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 06, 2026 | 5:54 PM
Share

बुधवारी शिवसेना पक्षाचं चिन्ह आणि नाव यावर सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली होती. यावेळी शिवसेना ठाकरे गटाकडून ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. दरम्यान त्यानंतर आज देखील सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. आज देखील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. यावर आता ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले सरोदे? 

धनुष्यबाण चिन्हावर सुनावणी झाली आहे. राजकीय पक्ष श्रेष्ठ आहे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.  तीन न्यायाधीशांनी स्पष्ट केलं की राजकीय पक्षाला डावललं जाऊ शकतं नाही. निवडून आलेल्या सदस्यांना मत मांडण्यासाठी संधी असावी. उद्धव ठाकरे यांच्याकडून आक्षेप आहे की पक्ष आणि चिन्ह याबबतीत मर्यादा ओलंडली आहे.  भारतीय जनता पक्षाच्या सांगण्यानुसार ही बाब झालीये असं माझं मत आहे. बहुमताच्या जीवावर एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला सूट देण्यात आली हे चूक आहे. राज्यपाल यांनी दिलेला निर्णय चुकीचा आहे, असं यावेळी सरोदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान ते पुढे बोलताना म्हणाले की, पुढच्या सुनावणीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला बाजू मांडण्याची संधी मिळेल, मात्र आम्हाला देखील मतं मांडण्यासाठी संधी मिळेल. आम्हाला अपेक्षा आहे की आमच्या बाजूने निर्णय लागेल, लोकशाही संविधानिक मार्गाने टिकण्यासाठी निर्णय लागणे गरजेचे आहे. राजकीय आणि विधिमंडळ ही बाब वेगळी आहे.  राजकीय पक्षाला डावलून विधिमंडळ पक्षाला महत्त्व देता येणार नाही, कारण राजकीय पक्ष हा कायमस्वरूपी असतो. तर विधिमंडळ पक्ष हा पाच वर्षासाठी असतो. चिन्ह आणि पक्ष यांचा निर्णय एक वर्षात लागू शकतो, असं सरोदे यांनी म्हटलं आहे.

मुळात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत. त्यांचा युक्तिवाद ताकदीचा आहे. सत्य कायमच शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाबरोबर राहील.  राजकीय पक्षावर वर्चस्व कोणाचं आहे हे महत्त्वाचे ठरते. केवळ निवडून आलेल्या आमदारांना पक्ष बहाल करण हे बरोबर नाही, असंही यावेळी सरोदे यांनी म्हटलं आहे.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल