कोल्हापूरमध्ये कोरोनाकाळात 35 कोटींचा भ्रष्टाचार?, भाजपच्या आरोपाने खळबळ

कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोरोनाकाळात साहित्य खरेदीत तब्बल 35 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी केलाय (kolhapur jilha parishad corruption)

कोल्हापूरमध्ये कोरोनाकाळात 35 कोटींचा भ्रष्टाचार?, भाजपच्या आरोपाने खळबळ
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 3:03 PM

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेत कोरोनाकाळातील साहित्य खरेदीत तब्बल 35 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपचे जिल्हा परिषद सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी केलाय. मास्क, थर्मल स्कॅनर, पल्स ऑक्सिमीटर, बेड अशा प्रकारचे साहित्य खरेदी करताना हा गैरव्यवहार करण्यात आल्याचं निंबाळकर यांनी म्हटलंय. त्यांच्या या आरोपामुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. (while purchasing medical instruments in Corona pandemic Kolhapur Jilha Parishad made corruption of 35 crore BJP alleged)

खरेदी व्यवहरात अनेक त्रुटी

कोरोना संसर्गाला थोपवण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेकडून अनेक सामानाची खरेदी करण्यात आली. यामध्ये मास्क, थर्मल स्कॅनर, बेड अशा विविध गोष्टींचा समावेश होता. मात्र, या व्यवहारात तब्बल 35 कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचं राजवर्धन निंबाळकर यांनी म्हटलंय. तसेच, त्यांच्या या दाव्याला पुष्टी म्हणून त्यांनी लेखापरीक्षणाचा दाखला दिला आहे. कोरोना काळात वेगवेगळ्या साहित्याची खरेदी करण्यात आली. ही खरेदी अव्वाच्या सव्वा दराने केली गेली. तसेच, कोरोना काळात झालेल्या साहित्य खरेदीच्या लेखापरीक्षणातील अनेक त्रुटी लेखापरीक्षकांनी स्पष्टपणे निदर्शनाला आणून दिल्या आहेत, असे म्हणत त्यांनी काही राजकीय मंडळींच्या नातेवाईकांना पोसण्यासाठी ऐन वेळी तयार झालेल्या फर्मकडून ही खरेदी केली गेली, असा गंभीर आरोपीही त्यांनी केलाय.

अन्यथा न्यायालयीन लढाई लढू

यावेळी या भ्रष्टाचाराची कसून चौकशी व्हायला हवी अशी मागणी राजवर्धन निंबाळकर यांनी केली. तसेच, राज्य सरकारने जर या प्रकराची दखल घेतली नाही; तर प्रसंगी जनहित याचिकेद्वारे न्यायालयीन लढाई लढू ,असा इशारादेखील यावेळी निंबाळकर यांनी दिलाय.

दरम्यान, जिल्हा परिषदेत झालेला घोटाळा मोठा असून त्याची निष्पक्षपणे चौकशी व्हायला हवी असे म्हणत त्यांनी या घोटाळ्यात सामील असणाऱ्या राजकीय मंडळी आणि अधिकाऱ्यांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे. त्यांच्या या खुलाशाने कोल्हापुरातील राजकीय गोटात खळबळ उडाली असून निंबाळकर आगामी दिवसांत नेमका कोणता खुलासा करणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

इतर बातम्या :

“आमचे राज्यपाल करुणेचा सागर, पण मांडीखाली दाबलेले आमदार मोकळे करा”, संजय राऊतांचा कोश्यारींना टोला

शेंबड्या पोराने केंद्रीय मंत्र्याला ठोकला, हर्षवर्धन जाधवांचा दानवेंना टोला, लेकाचा 2029 चा आमदार उल्लेख

“पंकजा मुंडेंची मागणी योग्यच, धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा”

(while purchasing medical instruments in Corona pandemic Kolhapur Jilha Parishad made corruption of 35 crore BJP alleged)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.