AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निदा खान प्रकरणात एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी, मतीन पटेल कोण आहे? त्याच्यावर नेमका आरोप काय?

Matin Patel : निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला सहआरोपी करण्यात आले आहे. हा मतीन पटेल कोण आहे ते जाणून घेऊयात.

निदा खान प्रकरणात एमआयएमचा नगरसेवक सहआरोपी, मतीन पटेल कोण आहे? त्याच्यावर नेमका आरोप काय?
Matin PatelImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 08, 2026 | 3:38 PM
Share

नाशिकच्या टीसीएस (TCS) कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, धर्मांतराचा प्रयत्न आणि विनयभंग प्रकरणी संशयित आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली आहे. तिला लवकरच कोर्टात हजर केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. निदा खान आणि तिच्या कुटुंबीयांना गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आता एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलला सहआरोपी करण्यात आले आहे. हा मतीन पटेल कोण आहे? त्यांच्यावर नेमका आरोप काय आहे याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मतीन पटेल सहआरोपी

एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेलवर निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप आहे. आता या प्रकरणात नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई केली असून निदा खानला आश्रय मतीन पटेल याला सह आरोपी केले आहे. पटेल यांच्या विरोधात नाशिकमध्ये बीएनएसचे कलम 249 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्याला नाशिक गुन्हे शाखेकडून चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कोण आहे मतीन पटेल?

मतीन पटेल हा पहिल्यांदाच एमआयएम पक्षाकडून नगरसेवक म्हणून निवडून आला आहे. यापूर्वी तो एमआयएमचा सक्रिय कार्यकर्ता होता. निवडणूक काळात मतीन पटेल आणि एका महिलेचा अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता. तेव्हा मतीन हा चर्चेत आला होता. त्यावेळी त्याच्यावर मोठी टीकाही झाली होती. मतीन हा एमआयएम नेते आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या निकटवर्तीय नगरसेवक पैकी एक आहे. तो एमआयएमचा बालेकिल्ला असलेल्या नारेगाव भागातून नगरसेवक आहे. तो याआधीही विविध वादांमुळे चर्चेत होता.

दरम्यान, निदा खान ही 25 मार्चपासून फरार होती आणि गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होती. तिला एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांनी आसरा दिला होता. निदा खान ही नारेगावातील कैसर कॉलनी येथील फ्लॅटमध्ये तिची आई, वडील, भाऊ आणि काकीसोबत राहत होती. ती अवघ्या चार दिवसांपूर्वीच या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी आली होती. पोलिसांना याची माहिती मिळताच या ठिकाणाची रेकी करून सापळा रचून निदा खानला अटक करण्यात आली आहे. आता चौकशीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?