AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे पाटलांना भेटलेली ती व्यक्ती कोण? भेटीनंतर सूत्रं फिरले, बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने मोठी खळबळ

मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनाची हाक दिली आहे. ते येत्या 30 मे पासून उपोषणाला बसणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील बड्या नेत्यानं मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मनोज जरांगे पाटलांना भेटलेली ती व्यक्ती कोण? भेटीनंतर सूत्रं फिरले, बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने मोठी खळबळ
manoj jarange patilImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 16, 2026 | 4:08 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे. ते येत्या 30 मे पासून आंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी आज बैठक बोलावली होती, या बैठकीमध्ये त्यांनी आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आता मराठा आरक्षणाचा प्रश्न तापण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी जातीचं प्रमाणपत्र मिळावं, त्यांचा समावेश हा ओबीसी प्रवर्गात व्हावा, हैदराबाद गॅझेटचा निर्णय पूर्णपणे आमलात आणावा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेण्यात यावेत, या मागण्या सरकारने 29 मे पर्यंत पूर्ण कराव्यात असं मनोज जरांगे पाटील यांनी या बैठकीमध्ये म्हटलं आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाची तारीख जाहीर करताच आता त्यावर समिश्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या घोषणेवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते प्रसाद लाड यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. जरांगे पाटील यांची कुणीतरी भेट घेतली आणि त्यानंतर त्यांनी उपोषणाचा इशारा दिला, असा गौप्यस्फोट प्रसाद लाड यांनी केला आहे. दरम्यान प्रसाद लाड यांच्या या गौप्यस्फोटामुळे मनोज जरांगे पाटील यांना भेटलेली ती व्यक्ती नेमकी कोण? अशा चर्चेला उधाण आलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत रोष असल्याने त्यांचं नाव घेतलं जात आहे. काळकुटे यांच्याशी बोलणं झालं आहे.  त्यांनी मला सांगावं, त्यांच्या काय समस्या आहेत, त्यावर तोडगा काढला जाईल. एवढे मराठा समाजाचे नेते झाले, मुख्यमंत्री झाले त्यांनी का आरक्षण दिलं नाही? प्रत्येक गोष्ट मनोज दादांच्या मनासारखी होणार नाही, काही गोष्टी सरकारला नियमात बसून कराव्या लागतात, त्यामुळे ऊन्हाळ्याच्या दिवसात मराठा समाजाची हेळसांड होऊ नये, असं प्रसार लाड यांनी म्हटलं आहे.

Follow Us
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
कोरोना काळात भारताने स्वत:सोबत जगालाही वाचवलं -पंतप्रधान नरेंद्र मोदी
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील...
महत्त्वाकांक्षेसाठी नाही, मिशनसाठी जगतो’; 25 वर्षांच्या सत्तेतील प्रवासावर मोदींचं मनोगत
25 वर्षांचा राजकीय प्रवास; मोदींच्या कार्याचा विशेष गौरव
25 वर्षे जनसेवेची! PM मोदींच्या सत्तेतील प्रवासाचे नीतिन नबीन यांच्याकडून कौतुक
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप,
इंडिया आघाडीच्या मोर्चावर पोलिसी कारवाई; संजय राऊतांचा संताप, म्हणाले...
पंतप्रधान मोदींनी सलग 25 वर्षे अखंड सेवेचा टप्पा गाठला
PM Modi : मुख्यमंत्री ते पंतप्रधान; नरेंद्र मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी...
रेपो रेट वाढणार? आज RBI च्या निर्णयाकडे देशाचे लक्ष; EMI बाबत मोठी अपडेट समोर
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता...
मोदींच्या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण; शिंदेंकडून ‘सामना’ वगळता सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात