AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार असो की जीत, दादागिरीसाठी ओळखले जाणारे टार्गेट अजितदादा

राज्यात महायुतीचं सरकार आलं असलं तरी सरकार स्थापन होण्यासाठी विलंब होत आहे. महायुतीचं सरकार आता ५ डिसेंबरला स्थापन होणार आहे. त्याआधी महायुतीमध्ये खाते वाटपावरुन ओढाताण सुरु असल्याची चर्चा आहे. अजित पवार हे उपमुख्यमंत्री होणार आहे. पण ते महायुतीत आल्यापासून चर्चेत आहेत.

हार असो की जीत, दादागिरीसाठी ओळखले जाणारे टार्गेट अजितदादा
| Updated on: Dec 02, 2024 | 10:56 PM
Share

लोकसभेच्या पराभवाचं खापर भाजपच्या अनेक लोकांनी अजित पवारांवर फोडलं. त्यानंतर आता विधानसभेत मिळालेल्या कमी जागांवरुन शिंदेंच्या नेत्यांकडून अजित पवारांना खलनायक ठरवलं जातंय. एरव्ही बार्गेनिंगमध्ये दादागिरीसाठी ओळखल्या जाणाऱ्या अजितदादांनी ना मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितलाय, ना ही त्यांनी गृहखात्यासाठी आग्रह धरलाय. लोकसभेत वाट्याला फक्त 4 जागा येवूनही दादांचा गट रुसला नाही आणि विधानसभेत फक्त 59 जागा मिळूनही नाराजीचा एक शब्दही काढला नाही. पण तरी महायुतीत पराभवाचे खलनायक आणि मोठ्या विजयातले अडसरही अजित पवारच असल्याची विधानं होतायत.

गुलाबराव पाटलांचा तर्क असा आहे की जर अजित पवार महायुतीत नसते तर शिंदेंच्या शिवसेनेला 288 पैकी 125 जागा आरामात लढायला मिळाल्या असत्या. त्यापैकी आम्ही 100 जागा जिंकून उर्वरित 163 जागा भाजप आणि मित्रपक्ष लढले असते.

भुजबळांचं म्हणणं आहे की जर शिंदेंच महायुतीत नसते., तर सव्वाशे जागा लढून आम्हालाही १०० जागा मिळाल्या असत्या आणि उर्वरित 163 जागी भाजप लढली असती.

महायुतीत शिंदेंच्या 81 पैकी 57 जागा आल्या. स्ट्राईक रेट जवळपास ७० चा राहिला. 59 पैकी 41 जागा जिंकणाऱ्या अजित पवारांचा स्ट्राईक रेट जवळपास 69 होता. आणि 149 लढून 132 जागा मिळवणाऱ्या भाजपचा स्ट्राईक रेट जवळपास 80 राहिला. या स्ट्राईक रेटनुसार जर भाजप स्वबळावर 170 जागा लढली असती तर 145 च्या बहुमताचा आकडा त्यांनी एकट्यानं पार केला असता., पण अद्याप शिंदे-दादांच्या नेत्यांच्या वादात भाजपनं उडी घेतलेली नाही.

लोकसभेला 15 पैकी 7 खासदार जिंकणाऱ्या शिंदेंच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट जवळपास 46 होता. 4 पैकी 1 जिंकणाऱ्या अजित पवारांचा स्ट्राईक रेट 25 चा आणि 28 पैकी 9 खासदार जिंकणाऱ्या भाजपचा स्ट्राईक रेट 32 राहिला. तेव्हा लोकसभा निकालानंतर भाजपचा आकडा घटला म्हणून भाजपच्याच काही नेत्यांनी दादांवर खापर फोडलं होतं. आणि आता विधानसभेला अजून आकडा वाढला असता म्हणून शिंदेंच्या नेत्यांनी अजित पवारांना टार्गेट केलंय.

लोकसभेपासून महायुतीत अजित पवार सॉप्ट टार्गेट झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण, अजित पवारांनी 41 जागा जिंकल्या असल्या तरी त्यांचे काही उमेदवार भाजपातून आयात केले होते. प्रचारादरम्यान सर्वच पक्षात बड्या नेत्यांचे प्रवेश होत असताना अजित पवार गटात कोणत्याही मोठ्या नेत्यानं प्रवेश केला नाही. म्हणून हार होवो की जीत लोकसभेनंतर आता शिंदेंच्या सेनेकडून अजितदादा कारणीभूत ठरवले जातायत.

सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार.
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!
रवींद्र चव्हाणांशी चर्चेनंतर शिंदेंची आक्रमक देहबोली!.
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.