Sanjay Raut : ‘रेडे कापले त्यांची शिंग लॉनमध्ये पुरली’, संजय राऊत यांचा खळबळजनक दावा

Sanjay Raut : "देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाहीत? मारूती कांबळेचे काय झाले हा आमचा प्रश्न आहे. इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन, वर्षा मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे, तिथे मुख्यमंत्री का जात नाहीत?" असा सवाल संजय राऊत यांनी केला.

Sanjay Raut : रेडे कापले त्यांची शिंग लॉनमध्ये पुरली, संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
संजय राऊत
| Updated on: Feb 04, 2025 | 8:53 AM

“पंतप्रधान महिनो न महिने संसदेत येत नाहीत. पंतप्रधानचे काम आहे त्यानिमित्ताने त्यांना संसदेत यावे लागते. लोकसभा, राज्यसभेत यायचे असते. विरोधी पक्ष काय बोलतो ते ऐकायचे असते. खासदारांच्या प्रश्नाला उत्तर घ्यायचे असते” असं खासदार संजय राऊत बोलले. “पंडीत नेहरूवर टीका करतात, पण नेहरी इंदिरा गांधी, नरसिंह राव पूर्ण वेळ संसदेत बसत होते. लोकशाही मजबूत केली, मोदी लग्नाच्या हॉलमध्ये संसद भरवत आहेत का? संसद सुद्धा बँकवेट हॉल सारखी केली” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“देवेंद्र फडणवीस अजून वर्षा बंगल्यावर का जात नाहीत? मारूती कांबळेचे काय झाले हा आमचा प्रश्न आहे. इतके महिने झाले मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन, वर्षा मुख्यमंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आहे, तिथे मुख्यमंत्री का जात नाहीत? याचे उत्तर लिंबू सम्राटने द्यावे” अशी मागणी संजय राऊत यांनी केली. “भाजपच्या गोटात चर्चा आहे की, कामाख्या देवीला रेडे कापले त्यांची शिंग लॉनमध्ये खोदकाम करून तिथे पुरली आहेत. असा स्टाफ आणि त्याचे लोक सांगतात” असा दावा संजय राऊत यांनी केला.

मुख्यमंत्र्यांच्या मनात काय भीती आहे?

“आमचा विश्वास नाही, पण मुख्यमंत्री पद कोणाकडे टिकू नये यासाठी मंतरलेले शिंग आणल्याचे आम्ही ऐकले आहे. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा पळणारी लोक आहोत” असं संजय राऊत म्हणाले. “आम्ही मुद्दा लावून धरत आहोत, काहीतरी वेगळे घडू शकते नेमके काय झाले? मुख्यमंत्र्यांच्या मनात काय भीती आहे? ते का अस्थिर अस्वस्थ आहेत? असे प्रश्न संजय राऊत यांनी विचारले.

उदय सामंत हे सुद्धा कोकणातले आहेत

“महाराष्ट्र पुरोगामी आहे, अंधश्रद्धा निर्मूलनसाठी काम करणाऱ्या सर्वांनी महाराष्ट्रातून अंधश्रद्धा निर्मूलनासाठी काम केले, तरीही महाराष्ट्र मध्ये अंधश्रद्धा कायम आहे. उदय सामंत हे सुद्धा कोकणातले आहेत, त्यांच्याकडे ताकद असेल तर त्यांनी त्याचे काम करत रहावे. आम्ही आमचे काम करत राहू” असं संजय राऊत म्हणाले.