AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार का? 5 मुद्द्यात समजून घ्या

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वात महायुतीने चमकदार कामगिरी केली आहे. महायुतीने आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मिळवला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा सुरु आहेत. देवेंद्र फडणवीस या शर्यतीत सर्वात प्रबळ दावेदार का आहेत. कोणत्या गोष्टी त्यांना मुख्यमंत्रीपदाबाबत मजबूत उमेदवार बनवतात जाणून घ्या.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार का? 5 मुद्द्यात समजून घ्या
Follow us
| Updated on: Nov 25, 2024 | 4:07 PM

महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेंस आहे. नव्या सरकारचा शपथविधी २६ नोव्हेंबरला होऊ शकतो. पण महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. मुंबई पासून दिल्लीपर्यंत राजकीय चर्चा सुरु आहेत. महायुतीच्या या रेकॉर्डब्रेक विजयानंतर भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे असल्याचे मानले जात आहे. आज संध्याकाळी पर्यंत याची घोषणा होऊ शकते. राष्ट्रवादी काँग्रेसने फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा दिलाय. दुसरीकडे फडणवीसांचे मुख्यमंत्री म्हणून पोस्टर्स देखील नागपुरात लागले आहेत. भाजप कार्यकर्त्यांची पुन्हा फडणवीसच मुख्यमंत्री व्हावे हीच भावना आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार का?

1. 2019 मध्ये उद्धव ठाकरे यांनी युतीतून बाहेर पडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. त्यामुळे भाजपला सर्वाधिक जागा मिळून देखील देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होता आले नाही. नंतर शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री व्हावे लागले.

2. महाराष्ट्रात शिवसेनेनंतर राष्ट्रवादी देखील फुटली. दुसरीकडे ‘एकतर तू राहशील नाही तर मी राहीन’ अशी धमकी मनोज जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर टीका करताना दिली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांच्या राजकीय चाणाक्षतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. शरद पवारांनी त्यांना ‘अनाजी पंत’ म्हणत खिल्ली उडवली होती.

3. देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर विरोधकांनी उपहासात्मक टीका केली. दोन पक्ष फोडल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. ज्यामळे ते टीकेचे केंद्र बनले. देवेंद्र फडणवीस यांनी या सर्वांना तोंड दिले आणि संयम राखला.

4. लोकसभेत महायुतीला मोठा धक्का बसल्यानंतर फडणवीस यांनी अतिशय चोखपणे रणनीती राबवली आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीला राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवून दिला. राजकीय विश्लेषक म्हणतात की, देवेंद्र फडणवीस हे सामनावीर ठरले. दोन वर्षात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तरी त्यांना प्रत्येक निर्णयावर फडणवीसांची मान्यता आणि भाजपच्या 115 आमदारांचा पाठिंबा होता. त्यामुळे त्यांना असे निर्णय घेता आले.

5. लोकसभेतील खराब कामगिरीची जबाबदारी घेत देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली. पण केंद्रीय हायकमांडच्या आदेशानंतर ते पदावर कायम राहिले. पण विधानसभेत त्यांनी भाजपची रणनीती जमिनीवर राबवली आणि भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीने विक्रमी विजय संपादन केला.

फडणवीसांच्या नेतृत्वात सगळ्यात मोठा विजय

भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने जर दुसऱ्याला मुख्यमंत्री केले तर २०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी जनादेश नाकारुन जी चूक केली होती तीच चुक भाजप पुन्हा करेल. अशी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पण राज्याने पुन्हा एकदा फडणवीसांना मोठा जनादेश दिला आहे. 2014 मध्ये मोदी लाटेत भाजपला 122 जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर 2019 मध्ये 105 जागा जिंकल्या होत्या. पण आताच्या निवडणुकीत भाजपने 132 जागा जिंकल्या आहेत. त्यांनीच त्यांचा हा रेकॉर्ड मोडला आहे. तर शिंदे आणि अजित यांच्या पक्षातून लढणारे भाजपचे 9 नेते विजयी झाले आहेत. अशा प्रकारे भाजपचे एकूण 142 आमदार निवडून आले आहेत. याशिवाय 5 अपक्ष आमदारांनी देखील मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला आहे.

बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला
बाळासाहेबांनी सत्तेच्या खुर्चीला लाथ मारली पण.. ; शिंदेंचा टोला.
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत
५६ इंच छातीवाले ट्रम्पचा फोन आल्यानंतर सरेंडर होतात - संजय राऊत.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून राऊतांची शिंदेसेनेवर टीका.
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला
मातोश्रीसमोरील शिंदेंच्या शिवसेनेचा बॅनर फाडला.
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी
.. तर जबाबदार तुम्हीच असाल, मनसे कार्यकर्त्याची सदावर्तेंना धमकी.
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली
जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली, नागरिकांची घरं पाण्याखाली गेली.
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल
नाले सफाईचे कोट्यवधी रुपये कुठे खर्च करता? सुप्रिया सुळेंचा सवाल.
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली
इगतपुरीला पावसानं झोडपलं; पर्यटकाची कार बुडाली.
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं
मुंबईकरांना महत्वाची बातमी! मध्य रेल्वेवरील वाहतूक पाऊण तास उशिरानं.
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी
या कारणामुळे इंद्रायणी नदीत जाण्यासाठी वारकऱ्यांनी बंदी.