खा. दिलीप गांधींना संसदेत तंबाखू मळायला पाठवलंय का? धनगर नेत्यांचा सवाल

अहमदनगर : नगर जिल्ह्याचे भाजपचे खासदार दिलीप गांधी यांची दांडी गूल करा… संसदेत काय तंबाखू मळायला पाठवलंय का? धनगर आरक्षणावर का बोलत नाहीत? असा घणाघात धनगर समाजाचे नेते गोपिचंद पडळकर यांनी केलाय. धनगर समाजाचा प्रश्न न सोडवल्यास आगामी निवडणुकी भाजपला मतदान न करण्याची शपथ गोपिचंद पडळकर यांनी समाजाला घ्यायला लावली आहे. धनगरांना लोकसभा निवडणुकीपूर्वी एसटी …

खा. दिलीप गांधींना संसदेत तंबाखू मळायला पाठवलंय का? धनगर नेत्यांचा सवाल

अहमदनगर : नगर जिल्ह्याचे भाजपचे खासदार दिलीप गांधी यांची दांडी गूल करा… संसदेत काय तंबाखू मळायला पाठवलंय का? धनगर आरक्षणावर का बोलत नाहीत? असा घणाघात धनगर समाजाचे नेते गोपिचंद पडळकर यांनी केलाय. धनगर समाजाचा प्रश्न न सोडवल्यास आगामी निवडणुकी भाजपला मतदान न करण्याची शपथ गोपिचंद पडळकर यांनी समाजाला घ्यायला लावली आहे.

धनगरांना लोकसभा निवडणुकीपूर्वी एसटी (अनुसूचित जमाती) प्रमाणपत्र दिलं नाही तर भाजपला मतदान करायचं नाही, अशी रोखठोक भूमिका धनगर गोपिचंद पडळकर यांनी समाजासमोर मांडत तशी शपथही घ्यायला लावली. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाजही आता आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. राहुरी येथील धनगर आरक्षण एल्गार मेळाव्यात बोलताना पडळकर यांनी सरकारच्या भूमिकेवर आपली रोखठोक भूमिका मांडली.

राज्यकर्त्यांनी आजवर धनगर समाजाला झुलवत ठेवलं आहे. चार वर्षांपूर्वी भाजपने  आरक्षणाचं आश्वासन दिलं ते पूर्ण केलं नाही. म्हणून आता हा समाजाचा अखेरचा लढा असल्याचं धनगर नेते उत्तमराव जानकर यांनी स्पष्ट करत लोकसभा निवडणुकी अगोदर प्रश्न सोडवा अन्यथा सरकारला खड्ड्यात गाडू, असा इशारा जानकर यांनी राहुरी येथील एल्गार मेळाव्यात दिलाय.

काँग्रेस राष्ट्रवादीने आमची आजवर फसवणूक केली. फक्त काँग्रेसच बेईमान आहे असं नाही. हे भाजपही सत्तेवर आल्यावर बेईमान झालं. येणाऱ्या दहा दिवसात धनगर आरक्षणाचा प्रश्न मिटवा. आता समाजाचा संयम सुटलाय. सरकार काय मंत्रालय जाळण्याची वाट बघतंय का? असा सवाल उत्तमराव जानकर यांनी उपस्थित केलाय.

टाटा इंन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या अहवालाची गरज नाही. धनगर समाजाचा मार्ग खडतर झाला असं कोणी म्हणत असतील तर सरकारचा मार्गही खडतर असल्याचं पडळकर म्हणाले.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *