पत्नीवर आधी ब्लेडने वार, नंतर पत्नीचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर पोस्ट

पत्नीवर आधी ब्लेडने वार, नंतर पत्नीचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर पोस्ट

नागपूर : माहेरी गेलेली पत्नी परत नांदायला येत नसल्याने पतीने पत्नीचे आक्षेपार्ह फोटो फेसबुकला पोस्ट केले. हा धक्कादायक प्रकार नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यात घडला आहे. पत्नीच्या माहेरच्या मंडळींच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

काही महिन्यापूर्वी लग्न झाल्यानंतर पती कोणतेही काम करत नव्हता. यामुळे दोघांमध्ये अनेकदा कामावर न जाण्याच्या कारणामुळे वाद होत असे. नाराज झालेल्या पत्नी वादानंतर रागात घर सोडून माहेरी निघून गेली. माहेरी गेलेली पत्नी परत नांदायला येत नसल्याने रागात पतीने पत्नीचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल केले.

या घटनेमुळे पत्नीच्या माहेरच्यांनी संताप व्यक्त करत थेट आरोपी पतीच्या विरोधात तक्रार केली. तसेच या आधीही आरोपी पतीने बसस्टॉपवर पत्नी तिच्या वडिलांसह दिसताच तिच्यावर ब्लेडने वार करुन जखमी केले होते. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Published On - 11:53 am, Thu, 20 December 18

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI