parambir singh letter | गृहमंत्री अनिल देशमुखांवर टांगती तलवार; जयंत पाटील म्हणाले…

महाविकास आघाडी सरकरने कठोर भूमिका घेतल्यामुळे त्यांची ही प्रतिक्रिया आली असेल अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली. (mansukh hiren mukesh ambani jayant patil)

parambir singh letter | गृहमंत्री अनिल देशमुखांवर टांगती तलवार; जयंत पाटील म्हणाले...
जयंत पाटील
Follow us
| Updated on: Mar 21, 2021 | 1:00 AM

मुंबई : गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना 100 कोटी रुपयांच्या वसुलीचं टार्गेट दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी  शनिवारी (20 मार्च) रोजी केला. मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात सिंग यांनी हा दावा केल्यानंतर या लेटर बॉम्बमुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. मात्र, महाविकास आघाडी सरकरने कठोर भूमिका घेतल्यामुळे त्यांची ही प्रतिक्रिया आली असेल अशी प्रतिक्रिया राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील (Jayant Patil) दिलीये. त्यांनी मुंबईचे माजी पोलीस महासंचालक परमबीर सिंग याचं नाव न घेता, ही प्रितक्रिया दिलीये. तसंच त्यांनी कोठेही लक्ष भटकू न देता मुकेश अंबानी यांच्या घरासमोर जिलेटिनने भरलेली गाडी कशी आली, हे सत्य जनतेसमोर आणणे गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलंय. ट्विट करुन त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीये.(will have to concentrate on Mansukh Hiren Mukesh Ambani bomb scare case said Jayant Patil)

अनिल देशमुख यांच्यावर पैशांच्या वसुलीचे गंभीर आरोप झाल्यांतर त्यांचा राजीनामा घ्यावा अशी जोरदार मागणी विरोधकांकडून होत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत, महाविकास आघाडीवर टीका केली. त्यांनीसुद्धा देशमुख यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केलीये. या पार्श्वभूमीवर आरोपांचे गांभीर्य ओळखता देशमुख यांची मंत्रिपदावरुन गच्छंती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच गृहमंत्रिपदाचा कारभार विद्यामान जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना सोपवण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी वरील संतुलीत प्रतिक्रिया दिलीय.

“राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर मुख्यमंत्री कार्यालयाने तसेच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कठोर भूमिका घेतली. या प्रकरणात जे कोणी अधिकारी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, अशी भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतल्याने त्यांची प्रतिक्रिया आली असेल. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर गाडी कोणी ठेवली?  त्यात जिलेटीनच्या कांड्या कोणी ठेवल्या?, मनसुख हिरेन प्रकरणात काय घडलं? हे राज्याच्या जनतेसमोर आणणे सध्या महाविकास आघाडी सरकारचे प्राधान्य आहे. त्यामुळे या प्रकरणावरून लक्ष विचलित होऊ नये याची काळजी घ्यावी,” असे जयंत पाटील यांनी म्हटलंय.

नेमकं प्रकरण काय ?

मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी केलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग (Prambir Singh) यांनी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh)  यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना याबाबत पत्र लिहिलं आहे.

परमबीर सिंह यांची बदली करण्यात आल्यानंतर अस्वस्थ असलेल्या सिंह यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांची तक्रार केली आहे. जवळ जवळ आठ पानांचं हे पत्र आहे. त्यात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. वाझेंना खात्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर मंत्र्यांनी काय काय टार्गेट दिलं होतं आणि कोणी कोणी वाझेंना काय काय सांगितलं होतं, याची सर्व धक्कादायक माहिती या पत्रात देण्यात आली आहे.

इतर बातम्या :

अनिल देशमुखांकडून वाझेंना महिन्याला 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट, परमबीर सिंगांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

चौकशीपासून बचावासाठीच परमबीर सिंगांचे खोटे आरोप, अनिल देशमुखांनी आरोप फेटाळले

Parambir Singh letter: अनिल देशमुखांचा तात्काळ राजीनामा घ्या; देवेंद्र फडणवीसांची मागणी

(will have to concentrate on Mansukh Hiren Mukesh Ambani bomb scare case said Jayant Patil)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.