VIDEO: सीडी लावण्याचं काम अजून बाकी; गिरीश महाजनांच्या मतदारसंघात येऊन खडसेंचा इशारा

भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात येऊन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी डरकाळी फोडली आहे. ('Will play CD if you unleash ED': Eknath Khadse warns BJP in jamner)

VIDEO: सीडी लावण्याचं काम अजून बाकी; गिरीश महाजनांच्या मतदारसंघात येऊन खडसेंचा इशारा
Follow us
| Updated on: Feb 12, 2021 | 9:38 AM

जळगाव: भाजप नेते गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघात येऊन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी डरकाळी फोडली आहे. सीडी लावण्याबाबत मी गंमतीने बोललो होतो. पण खरंच माझ्या मागे ईडी लावलीत, आता सीडी लावण्याचे काम अजून बाकी आहे, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला आहे. (‘Will play CD if you unleash ED’: Eknath Khadse warns BJP in jamner)

राष्ट्रवादी संवाद यात्रेला संबोधित करताना एकनाथ खडसे यांनी हा इशारा दिला. काल गुरुवारी रात्री 12 वाजता जामनेर येथे राष्ट्रवादी संवाद यात्रेला एकनाथ खडसे संबोधित करत होते. राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश घेताना माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेल, असं मी गंमतीने म्हणालो होतो. जयंतराव मला म्हणाले, तुमच्या मागे ईडी लागली तर तेव्हा मी म्हणालो मग मी सीडी लावेल. पण खरंच माझ्या मागे ईडी लागली. त्यामुळे आपलं काम अजून बाकी आहे. त्यांनी ईडी लावली. आता सीडी लावण्याचं काम बाकी आहे, असा इशारा खडसेंनी दिला. खडसे यांच्या या इशाऱ्यामुळे भाजपमध्ये पुन्हा खळबळ निर्माण होण्याची शक्यता आहे. खडसेंनी सीडी लावल्यास कुणाकुणाचे पितळ बाहेर पडणार? असा प्रश्न सध्या चर्चिला जात आहे.

नाथाभाऊ आहेत, चिंता नाही

नाथाभाऊ आपल्या सोबत असल्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. त्यांनी सुरु केलेल्या सिंचनाच्या प्रकल्पांमुळे या भागातील सिंचन क्षेत्र वाढले. नाथाभाऊंच्या कामामुळे खान्देशातील जनतेचा पक्षाला नक्कीच पाठिंबा मिळेल, असा विश्वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

जळगावातील दहा जागा जिंकण्याची रणनीती

जळगाव जिल्ह्यात आपण १० जागा लढवतो. इथे पक्ष बळकट करण्यासाठी एकनाथ खडसे यांच्या अनुभवाचा फायदा आपण करून घ्यायला हवा. आपण ताकदीने काम केलं तर इथे सहकार क्षेत्र, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला जिंकता येतील, असं जयंत पाटील म्हणाले.

पाच वर्षे धरणाचे काम रखडले

खडसेंनी पाडळसरे धरणाचे भूमीपूजन केले होते. खडसेचा स्पर्श झाला ती कामे करायचीच नाहीत, अशी भूमिका भाजपची आहे की काय? अशी शंका येते. म्हणूनच गेली पाच वर्षे या धरणाचे काम केले गेले नाही, असं ते म्हणाले.

पक्षवाढीच्या कामाला लागा

भाजपने शेतकरी-कामगार वर्गाला नाराज केले आहे. २०२४ च्या निवडणुकीत भाजपला मतदान मिळणे अवघड होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच पक्ष वाढीच्या कामाला लागावं, असं आवाहनही त्यांनी केलं. (‘Will play CD if you unleash ED’: Eknath Khadse warns BJP in jamner)

संबंधित बातम्या:

खडसेंची राष्ट्रवादीत एन्ट्री झाल्यानंतर जयंत पाटील पहिल्यांदाच जळगाव दौऱ्यावर, अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश, भाजपला रोखण्याची रणनिती!

राष्ट्रवादीच्या संवादयात्रेमुळे एक नवचैतन्य निर्माण होईल: एकनाथ खडसे

मी राज्यपाल नाही, तर राज्यसेवक आहे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

(‘Will play CD if you unleash ED’: Eknath Khadse warns BJP in jamner)

Non Stop LIVE Update
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.