Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्हाडात थेट पैशांचा पाऊस, महिलेनं अधिकाऱ्याच्या दालनात नोटाच उधळल्या

पैशांचा पाऊस पडणे.. बऱ्याच लोकांचं हे स्वप्न असतं, पण मुंबईतील एका कार्यालयात खरोखरच पैशांचा पाऊस पडला.  सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडा मुख्यालयाच्या कार्यालयात एक अजब प्रकार घडला. म्हाडा कार्यालयात आलेल्या एका महिलेने अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये जाऊन थेट पैशांच्या नोटाच उधळल्या.

म्हाडात थेट पैशांचा पाऊस, महिलेनं अधिकाऱ्याच्या दालनात नोटाच उधळल्या
म्हाडाच्या ऑफीसमध्ये महिलेने उधळल्या नोटा
Follow us
| Updated on: Feb 15, 2025 | 9:48 AM

पैशांचा पाऊस पडणे.. बऱ्याच लोकांचं हे स्वप्न असतं, पण मुंबईतील एका कार्यालयात खरोखरच पैशांचा पाऊस पडला.  सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या म्हाडा मुख्यालयाच्या कार्यालयात एक अजब प्रकार घडला. म्हाडा कार्यालयात आलेल्या एका महिलेने अधिकाऱ्याच्या केबिनमध्ये जाऊन थेट पैशांच्या नोटाच उधळल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र या संपूर्ण घटनेनंतर सदर महिलेला सुरक्षा रक्षकांनी बाहेर काढले. मात्र हा गौडबंगाल नेमकं आहे तरी काय? अशी चर्चा म्हाडात याप्रकारानंतर रंगली होती.

म्हाडाच्या बांद्रे पूर्व येथील गृहनिर्माण भवन या मुख्यालयात मुंबई मंडळ, कोकण मंडळ, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्निर्माण मंडळ, झोपडपट्टी सुधार मंडळ अशी विविध कार्यालये आहेत. दररोज 4 ते 5 हजार लोक हे विविध कामानिमित्त म्हाडा मुख्यालयात जात असतात, भेट देत असतात. शुक्रवारी दुपारी असाच कामाचा दिवस होता. मात्र तेव्हाच आंदोलन करणारी एक महिला दुपारच्या सुमारास दुसऱ्या मजल्यावरील एका अधिकाऱ्याच्या केबिनबाहेर आली.

त्यानंतर तिने तेथे त्या अधिकाऱ्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या बॅगेतील पैसे काढले आणि त्या नोटा केबिनमध्ये उधळल्या. एवढंच नव्हे तर तिने पैशांचा हारही केबिनच्या दरवाजाला घातला. हा प्रकार घडला तेव्हा संबंधित अधिकारी पाणी पिण्यास गेले असल्यामुळे ते केबिनमध्ये उपस्थित नव्हते. दरम्यान, या प्रकारानंतर म्हाडाच्या सुरक्षा रक्षकांनी आंदोलन करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतले. मात्र मला हात लावाल तर या मजल्यावरून खाली उडी मारेन अशी धमकी महिलेने दिली होती. त्यानंतर तिला सुरक्षा रक्षकांनी तेथून हाकलून लावलं. या प्रकाराची सध्या सर्वत्र चर्चा रंगलेली आहे.

'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने...
'लाडकी बहीण'च्या पैशांवर पतीचा डल्ला, जाब विचारला म्हणून कोयत्याने....
खोक्याचं पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन, केली ही मोठी मागणी
खोक्याचं पोलिस कोठडीत अन्नत्याग आंदोलन, केली ही मोठी मागणी.
'...एकतर तो पुरूष नाहीच', नाव न घेता सुप्रिया सुळेंची मुंडेंवर टीका
'...एकतर तो पुरूष नाहीच', नाव न घेता सुप्रिया सुळेंची मुंडेंवर टीका.
बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्येला सरकार जबाबदार; अंबादास दानवेंचा आरोप
बीडमधील शिक्षकाच्या आत्महत्येला सरकार जबाबदार; अंबादास दानवेंचा आरोप.
शिवरायांचं एकमेव मंदिर भिवंडीत, 4 एकरवर उभारलं भव्य देऊळ,नेमकं खास काय
शिवरायांचं एकमेव मंदिर भिवंडीत, 4 एकरवर उभारलं भव्य देऊळ,नेमकं खास काय.
.. त्याचं संरक्षण करणं आमचं दुर्दैव आहे, नाहीतर.. ; फडणवीस स्पष्टच बोल
.. त्याचं संरक्षण करणं आमचं दुर्दैव आहे, नाहीतर.. ; फडणवीस स्पष्टच बोल.
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला; कोल्हापुरात बजरंग दल आक्रमक
औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापला; कोल्हापुरात बजरंग दल आक्रमक.
शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना 15 ते 20 जण जखमी, काय घडलं?
शिवनेरीवर शिवजन्मोत्सव साजरा होत असताना 15 ते 20 जण जखमी, काय घडलं?.
औरंगजेबाच्या कबरीवरून नितेश राणेंचा संताप अनावर; म्हणाले, 'ही घाण...'
औरंगजेबाच्या कबरीवरून नितेश राणेंचा संताप अनावर; म्हणाले, 'ही घाण...'.
अखेर दादांच्या राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या उमेदवाराचं नावं जाहीर
अखेर दादांच्या राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या उमेदवाराचं नावं जाहीर.