Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देव तारी त्याला … 16 महिन्यांत 5 वेळा हार्ट ॲटॅक येऊनही ‘ती’ जिवंत.. डॉक्टर्सही चक्रावले

मुलुंडमध्ये राहणाऱ्या एका 51 वर्षांच्या महिलेला गेल्या 16 महिन्यांमध्ये तब्बल 5 वेळा हार्ट ॲटॅक आला आहे. त्यांना पाच स्टेंट लावण्यात आले असून आत्तापर्यंत सहा वेळा त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून एक बायपास सर्जरीही झाली आहे.

देव तारी त्याला ... 16 महिन्यांत 5 वेळा हार्ट ॲटॅक येऊनही 'ती' जिवंत.. डॉक्टर्सही चक्रावले
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 1:28 PM

मुंबई | 7 डिसेंबर 2023 : हृदयविकाराचा झटका किंवा हार्ट ॲटॅक येणं हे कोणत्याही व्यक्तीसाठी अतिशय घाबरवणारं असतं. पण मुलुंडमध्ये राहणाऱ्या एका 51 वर्षांच्या महिलेला गेल्या 16 महिन्यांमध्ये तब्बल 5 वेळा हार्ट ॲटॅक आला आहे. सुनीता ( नाव बदललं आहे) यांना पाच स्टेंट लावण्यात आले असून आत्तापर्यंत सहा वेळा त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून एक बायपास सर्जरीही झाली आहे. 1 आणि 2 डिसेंबरदरम्यान त्यांना शेवटचा हार्ट ॲटॅक आला. मला नक्की काय झालयं, ज्यामुळे वारंवार या स्थितीचा सामना करावा लागत आहे, एवढाच प्रश्न सध्या त्यांच्या मनात घोळत आहे. तीन महिन्यात पुन्हा एखादं ब्लॉकेज डेव्हलप होईल का, हीच चिंता त्यांना सतावत असते.

16 महिन्यांपूर्वी आला पहिला हार्ट ॲटॅक

जयपूरहून बोरिवलीला येत असताना सप्टेंबर 2022मध्ये सुनीता यांना ट्रेनमध्ये पहिल्यांदा हार्ट ॲटॅक आला. रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याना अहमदाबादच्या सार्वजनिक रुग्णालयात दाखल केले. या वर्षी जुलै महिन्याापसून हृदयरोग विशेषज्ञ डॉ. हसमुख रावत यांच्याकडे सुनिता या उपचारांसाठी जात आहेत. तोपर्यंत त्यांच्या दोन अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी झालेली होती. त्यांच्या हृदयाशी संबंधित समस्या कशामुळे उद्भवतात हे तर एक रहस्यच आहे. व्हॅस्क्युलिटीस सारखा एक ऑटो-इम्युन आजार, हा यासाठी कारणीभूत ठरू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. या ऑटो-इम्युन आजारामध्ये रक्तवाहिन्या सूजतात आणि अरुंद होतात. पण सुनीता यांच्याबाबतीत नेमकं काय घडलंय, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

दर महिन्याला परत जाणवू लागतात

छातीत तीव्र वेदना, ढेकर येणे आणि बेचैन वाटणे यासारखी अनेक लक्षणे त्यांना दर काही महिन्यांनी जाणवू लागतात. सुनीत यांना फेब्रुवारी, मे, जुलै आणि डिसेंबरमध्ये हार्ट ॲटॅक आला. त्या आधीपासूनच मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल आणि जाडेपणा यांसारख्या समस्यांचा सामना करत होत्याच. सप्टेंबर 2022 मध्ये त्यांचं वजन 107 किलो होतं. पण तेव्हापासू आत्तापर्यंत त्यांचं वजन 30 किलोंहून अधिक कमी झालं. त्यांना ‘पीसीएसके9 इनहिबिटर’ हे कोलेस्ट्रॉल कमी करणारं इंजेक्शन देण्यात आल्याने त्यांची कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी झाली आणि मधुमेह देखील नियंत्रणात आहे. पण त्यांना अजूनही हार्ट ॲटॅक येतोच. पेशंट्समध्ये एकाच जागी वारंवार ब्लॉकेज होणं हे काही नवं नाही, पण सुनीता यांच्या केसमध्ये वारंवार, नव्या जागी ब्लॉकेजेस येत आहेत, असं डॉक्टरांनी सांगितलं.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.