जागतिक किडनी दिवस : बहिणीकडून भावाला किडनीदान, आठवणींना उजाळा

डॉक्टर असलेल्या भावाला किडनी देऊन बहिणीने जीवनदान दिले आहे. (Washim Sister Donate Kidney to Brother)

जागतिक किडनी दिवस : बहिणीकडून भावाला किडनीदान, आठवणींना उजाळा
Washim Sister Donate Kidney

वाशिम : बहीण भावाच्या नात्यावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक कथा आपण आजवर कथा-कादंबऱ्या, नाटक, चित्रपटाच्या माध्यमातून वाचल्या, ऐकल्या किंवा पाहिल्याही असतील. अशीच बहीण भावाच्या नाते संबंधातील पैलू उलगडणारी एक प्रेरणादायी गोष्ट घडली. डॉक्टर असलेल्या भावाला किडनी देऊन बहिणीने जीवनदान दिले आहे. डॉ. दामोधर काळे आणि बहीण देवकाबाई वानखेडे यांच्या अनोख्या नात्याची ही कहाणी आहे. बहिणीने भावाचा जीव वाचवल्याने भावाच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आहेत. (World kidney day 2021 Washim Sister Donate Kidney to Brother)

पाच वर्षापूर्वी किडनी निकामी 

डॉ दामोधर काळे हे वाशिम जिल्ह्यातील भटउमरा या गावचे आहेत पाच भाऊ आणि तीन बहीण असा त्यांचा परिवार. दामोदर काळे यांचे लग्न झाले असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पाच वर्षापूर्वी 2017 मध्ये अचानक एका कार्यक्रमातून परतल्यानंतर ते अचानक बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांनी वैद्यकीय तपासणी केली होती. ही तपासणी केल्यानंतर त्यांची किडनी निकामी झाल्याचे लक्षात आले.

तसेच त्यांना तातडीने किडनी प्रत्यारोपण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर त्यांच्या मुलाने त्यांना गुजरात येथील नाडीयाद येथे नेले. त्यावेळी त्यांची बहीण देवकाबाई या आपल्या भावाच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या.

जीवाची पर्वा न करता किडनी दानाचा निर्णय

देवकाबाई वानखेडे यांना आपल्या भावाची किडनी खराब झाल्याचे समजले. त्यांच्या शरीराला सूट होईल अशी किडनी मिळेपर्यंत बराच अवधी जाणार होता. यामुळे त्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता किडनी दान करण्याचा निर्णय घेतला. यामुळे आपल्या संसाराची वाताहत होईल की का? याचीही त्यांनी पर्वा केली नाही.

बहीण देवकाबाई वानखेडे यांनी त्यांची किडनी भाऊ डॉ दामोधर काळे यांना देण्याचे ठरवले. त्यानंतर गुजरात येथील मूलजी भाई पटेल इरॉलॉजीकल रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया पार पडली. (World kidney day 2021 Washim Sister Donate Kidney to Brother)

संबंधित बातम्या :

World Kidney Day 2021 : किडनीसाठी लाभदायी आहे राजमा, अनेक पोषक तत्वांचा आहे खजिना

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ टिप्स फाॅलो करा, पार्लरमध्ये जाण्याचीही भासणार नाही गरज!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI