Yaas Cyclone : पूर्व विदर्भावरही ‘यास’चा परिणाम, चक्रीवादळामुळे सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता

यास चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 24 तासांत विदर्भात पावसाच्या हलक्या सरी आणि सोसाट्याचा वारा वाहू शकतो, असा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तवला आहे (Yaas Cyclone).

Yaas Cyclone : पूर्व विदर्भावरही ‘यास’चा परिणाम, चक्रीवादळामुळे सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता
Rain

नागपूर : तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात देश (Yaas Cyclone) सावरतोच तो “यास” चक्रीवादळाने पुन्हा एकदा हाहाकार माजवला. जरी हे चक्रीवादळ महाराष्ट्रच्या किनारपट्टीवर आदळले नसले, तरी याने ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्ये मोठं नुकसान केलं. ओदिशा आणि पश्चिम बंगालला झोडपून काढणाऱ्या यास चक्रीवादळाला फटका आता महाराष्ट्रालाही बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे (Yaas Cyclone Effect On East Vidarbha Rain Expected With Thunderstorm).

या वादळाच्या परिणामामुळे आगामी दोन-तीन दिवसांत राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. यास चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. येत्या 24 तासांत विदर्भात पावसाच्या हलक्या सरी आणि सोसाट्याचा वारा वाहू शकतो, असा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तवला आहे.

यास चक्रीवादळ ओदिशातून, झारखंड, बिहार, छत्तीसगडच्या काही भागांत धडकण्याची शक्यता आहे. छत्तीसगडजवळच्या गोंदिया, गडचिरोलीसारख्या जिल्ह्यांमध्ये यासचा सौम्य प्रभाव पडण्याची शक्यता आहे. या भागात तासी 140 ते 150 किलोमिटर वेगाने वारे वाहू शकतात

तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

यास चक्रीवादळाने बिहारच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर त्याचे रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात झाले आहे. त्याचा प्रभाव हा शेजारच्या चार राज्यांवर जाणवणार आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधूदुर्ग, पुणे, नांदेड,लातूर अकोला, अमरावती, जालना या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे कोकणात प्रचंड नुकसान

काही दिवसांपूर्वीच अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे कोकण आणि गुजरात परिसरात प्रचंड नुकसान झाले होते. हे चक्रीवादळ कोकण आणि मुंबई किनारपट्टीच्या भागातून गेल्यामुळे मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहताना पाहायला मिळाले होते. त्यामुळे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड भागातील अनेक घरांची पडझड झाली. तसेच काही दुर्घटनांमध्ये लोकांनी आपला जीवही गमावला होता.

Yaas Cyclone Effect On East Vidarbha Rain Expected With Thunderstorm

संबंधित बातम्या :

VIDEO: यास चक्रीवादळ वेगानं पश्चिम बंगालच्या दिशेने; वस्त्यांमध्ये शिरलं समुद्राचं पाणी

VIDEO: पश्चिम बंगालमध्ये यास चक्रीवादळाचे थैमान, लोकांच्या कार पाण्यात बुडाल्या

VIDEO: बंगालमध्ये यास चक्रीवादळाचा प्रकोप; जेसीबी पाण्यात बुडाला

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI