यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या

यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (Yashaswini Woman brigade president murder in Ahmednagar). 

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर नगर शहराच एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे अनेकांना मोठा धक्का बसला असून राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे (Yashaswini Woman brigade president Rekha Bhausaheb Jare murder in Ahmednagar).

रेखा जरे कुटुंबियांसह आज संध्याकाळी पुण्याहून काम उरकून नगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा, सून, त्यांची आई देखील होते. या दरम्यान कारची काच एका दुचाकीला लागल्यामुळे वाद झाला. या वादातून रेखा जरे यांच्या मानेवर वार करण्यात आल्याची माहिती त्यांच्या मुलाने दिली.

पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हल्ल्याची घटना घडली. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला (Yashaswini Woman brigade president Rekha Bhausaheb Jare murder in Ahmednagar).

Published On - 11:31 pm, Mon, 30 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI