Yavatmal Crime: यवतमाळमध्ये साडेसात लाखांचे 96 किलो चंदन जप्त; वन विभाग व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेने आणि वन विभागाचे फिरते पथक यांना माहिती देऊन मुरझडी चिंच या गावी जाऊन या गावातील गोविंद व्यवहारे यांच्या शेतात जवळ सापळा रचला. या शेतातून दोन इसम पोत्यामध्ये चंदन आणत असल्याचे निदर्शनास आले.

Yavatmal Crime: यवतमाळमध्ये साडेसात लाखांचे 96 किलो चंदन जप्त; वन विभाग व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई
यवतमाळमध्ये साडेसात लाखांचे 96 किलो चंदन जप्त

यवतमाळ : यवतमाळ तालुक्यातील मुरझडी चिंच या गावात अवैधरित्या चंदनाची झाडे तोडून त्याची वाहतूक करणाऱ्यांवर वन विभाग आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईत 95 किलो 730 ग्रॅम चंदन अंदाजे किंमत सात लाख 65 हजार रुपयांचे जप्त करण्यात आले. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार झाला आहे. दशरथ सूर्यभान नोगमोते असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (96 kg sandalwood worth Rs 7.5 lakh seized in Yavatmal, Joint action of Forest Department and Local Crime Branch)

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून चंदन केले जप्त

चापडोह जंगल शिवारातून चंदनाची झाडे अवैधरित्या तोडून यवतमाळ तालुक्यातील मुरझडी चिंच या गावातून तस्करी करण्यात येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेने आणि वन विभागाचे फिरते पथक यांना माहिती देऊन मुरझडी चिंच या गावी जाऊन या गावातील गोविंद व्यवहारे यांच्या शेतात जवळ सापळा रचला. या शेतातून दोन इसम पोत्यामध्ये चंदन आणत असल्याचे निदर्शनास आले. वनविभाच्या व पोलीस पथकाला पाहताच त्यांनी पळ काढला. त्यांचा पाठलाग केला असता त्यांच्या जवळील पोत्यातून 51 चंदनाच्या झाडाचे तुकडे व चंदन झाडाचे बुंदे आढळून आले. याचे मोजमाप केले असता 95.730 किलो चंदनचा साठा केला जप्त केला.

फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरु

जप्त केलेले चंदन 7 लाख 65 हजाराचे असल्याची माहिती वनविभागाच्या फिरते पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी चेतन नेहारे यांनी सांगितले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा आणि वनविभागाने संयुक्तरित्या केली. फरार आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. (96 kg sandalwood worth Rs 7.5 lakh seized in Yavatmal, Joint action of Forest Department and Local Crime Branch)

इतर बातम्या

Yavatmal : यवतमाळमध्ये अज्ञात युवकाचा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यावर गोळीबार; डॉक्टरचा जागीच मृत्यू तर आरोपी फरार

Yavatmal : यवतमाळमधील ‘त्या’ गृहरक्षक तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू, आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात

Published On - 12:47 am, Wed, 12 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI