यवतमाळमध्ये बँकेत 10 कोटींचा फ्रॉड केल्याचा आरोप, जिल्हा उपनिबंधकावर गुन्हा दाखल

यवतमाळमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जिल्हा उपनिबंधकाने एजी जगताप फर्मवर असलेल्या 10 कोटींपेक्षा जास्त रुपये असलेलं कर्ज बुडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. संबंधित प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

यवतमाळमध्ये बँकेत 10 कोटींचा फ्रॉड केल्याचा आरोप, जिल्हा उपनिबंधकावर गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Feb 18, 2024 | 8:55 PM

विवेक गावंडे, Tv9 प्रतिनिधी, यवतमाळ | 18 फेब्रुवारी 2024 : यवतमाळ सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय. नानासाहेब चव्हाण यांच्यावर अवधुतवाडी पोलीस ठाण्यात अफरातफर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाबाजी दाते महिला सहकारी बँकेत संबंधित प्रकार घडला आहे. नानासाहेब चव्हाण यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जाची परतफेड येणे असणाऱ्या अकाउंटचे पैसे जमा असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला. यासाठी त्यांनी यवतमाळचे दुय्यम निबंधक यांची मदत घेतल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे.

नानासाहेब चव्हाण यांनी एजी जगताप फर्मवर असलेल्या 10 कोटींपेक्षा जास्त रुपये असलेलं कर्ज बुडवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. चव्हाण यांनी एजी जगताप फर्मच्या तारण गहाण स्थावर मालमत्तेला कर्जमुक्त करण्यासाठी खोटे दस्तऐवज नोंदविले. यासाठी त्यांनी दुय्यम निबंधकाची मदत घेतली. जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी या माध्यमातून थकीत कर्जदारांना कर्जमुक्त करुन बॅकेची सभासद आणि ठेवीदारांची फसवणूक केल्याची तक्रार महिला बँकेच्या माजी उपाध्यक्ष मनिषा कुळकर्णी यांनी केली.

या तक्रारीची गंभीर दखल पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण आणि जगताप फर्मच्या संचालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे जिल्हा उपनिबंधकांनी राजकीय दबावातून हे कृत्य केल्याची जोरदार चर्चा सध्या यवतमाळमध्ये सुरु आहे. या प्रकरणी आता काय-काय कारवाई होते, तसेच कोणकोणती नावे समोर येतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Non Stop LIVE Update
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले...
संविधान संपवण्याचा भाजपचा गेम? मोदींनी विरोधकांना फटकारलं; म्हणाले....
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर
ही गोष्ट तुमच्या तोंडून...,शरद पवारांवरील मोदींच्या टीकेवर प्रत्युत्तर.
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या
पक्षप्रवेशाविनाच खडसे भाजप कार्यालयात अन्...सर्वांच्या भुवया उंचावल्या.
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?
PM मोदींच्या 'त्या' वक्तव्याचा अर्थ काय? येत्या नव्या समीकरणाचे संकेत?.
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?
उद्धव ठाकरे शत्रू नाहीत, TV9च्या महामुलाखतीत काय बोलले पंतप्रधान मोदी?.