यवतमाळच्या सभेवेळी हेलिपॅडवर बॅग तपासली; उद्धव ठाकरे संतापले

Uddhav Thackeray Yavatmal Speech : दाढीवाला मिंधे, गुलाबी जॅकेट अन् टरबुजा...., म्हणत यवतमाळच्या सभेतून उद्धव ठाकरे कडाडले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. वाचा सविस्तर...

यवतमाळच्या सभेवेळी हेलिपॅडवर बॅग तपासली; उद्धव ठाकरे संतापले
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Nov 12, 2024 | 12:16 PM

यवतमाळच्या वणी विधानसभा क्षेत्रातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय देरकर यांच्या प्रचारसाठी महाविकास आघाडीची सभा झाली. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सभेला जाण्याआधी हेलिपॅडवर जात असतानाच उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांच्या बॅग तपासण्यात आल्या. त्यामुळे उद्धव ठाकरे संतापले. पुढे भाषणात त्यांनी यावरून यंत्रणेला सवाल केलाय. माझी बॅग तपासली, तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा अमित शाह आले तर त्यांच्या बॅग तपासणार का?, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे. दाढीवाला मिंधे, गुलाबी जॅकेट आणि काय…. असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यावर टरबुजा असा लोकांमधून आवाज आला. त्यानंतर हा यांच्या पण बॅगा पण तपासणार का?, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी केला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा टरबूज असा उल्लेख केला. लोकसभा निवडणुकीत मिंधे यांच्या बॅग चालल्या होत्या. मोकळ्या वातावरण निवडणूक व्हायला पाहिजे. ही लोकशाही असू शकत नाही. तुम्ही भाजपचे पंतप्रधान नाही देशाचे पंतप्रधान आहे. तुम्हाला संविधान बदलायचं आहे. मोदी शाह महाराष्ट्र येत आहे. अमित शाह 370 कलम काढले तेव्हा उद्धव ठाकरे सोबत होते. पण यांनी दिलेला शब्द पाळला नाही. मी लाथ मारली, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

सोयाबीन, कापसाला भाव मिळत आहे का? 370 कलम काढलं. पण पिकांना भाव नाही मिळाला. त्यांचा शेतकऱ्यांशी काही संबंध नाही. आपल्यारकडच्या कंपन्या गुजरात जात आहेत. आपल्या लोकांना किती नोकऱ्या मिळाल्या? अदानीला एअरपोर्ट वाढवण बंद देत आहेत. याला आम्ही विरोध करणारच आहे. वीज प्रकल्प अदानीकडे आहे, असा झालाय. नोकऱ्या गुजरातच्या लोकांना मिळत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केलाय.

वणीच्या जनतेला काय आवाहन?

उमेदवार घेऊन आलो पण आमदार घेऊन जाणार आहे. वणीचा आमदार मशालीचा पाहिजे. महाविकास आघाडी निवडून आणायचे आहे. प्रत्येक ठिकाणी विजय दिला असे सांगत आहे. 20 तारखेला डोळ्यावर पट्टी ठेऊ नका. डोळसपणाने मतदान करा. मी माणसाला नाही यंत्रणेला दोष देत आहे. जे आपल्याला तपासत आहे त्यांचेही खिसे तपासा हा मतदारच अधिकार आहे. तपास अधिकाऱ्याचे ओळख तपास. माझी बॅग तपासली तशी मोदी शाहाची बॅग मिंधे, गुलाबी जॅकेत यांची बॅग तपासली टरबूज बॅग तपासली का?, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता...
शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता....
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात.
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'.
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ.
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ.
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी.
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या.
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे.
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत.