AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार, स्वारगेट बसस्थानकाला नीलम गोऱ्हे यांची भेट

स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.या घटनेनंतर आता महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार, स्वारगेट बसस्थानकाला नीलम गोऱ्हे यांची भेट
| Updated on: Feb 27, 2025 | 12:25 PM
Share

पुणे येथील स्वारगेट बसस्थानकात रिकाम्या शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेनंतर या संशयित आरोपीचे चित्र जाहीर करण्यात आले आहे. या तरुणीने फिर्याद दाखल केल्यानंतर आरोपीचा शोध सुरु झाला आहे. या प्रकरणी आता शिवसेनेच्या नेता नीलम गोऱ्हे यांनी स्वारगेट बसस्थानकाला भेट देऊन घटना स्थळाची पाहणी केली आहे.

स्वारगेटसारख्या गजबजलेल्या बस स्थानक परिसरात एका तरुणीवर शिवशाही बसमध्येच पहाटे ५.३० वाजताच्या दरम्यान लैंगिक अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे स्वारगेट बस स्थानकाच्या जवळच पोलीस चौकी आहे. शिवाय पोलीस कर्मचारी बस स्थानकावर वेळोवेळी गस्त घालत असतात. तरीही अशा पद्धतीचा घृणास्पद गुन्हा करण्याची आरोपीचे धाडस झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, शिवसेना नेता नीलम गोऱ्हे यांनी घटना स्थळी ( स्वारगेट ) जाऊन पाहणी केली आहे.

येथे पाहा पोस्ट –

राज्यात आता गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हे दर्शविणारी स्वारगेटची घटना आहे. या राज्यात महिलांसाठी सुरक्षित जागा राहिलीच नाही का असा सवाल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे. त्याबाबत त्यांनी समाज माध्यमावर ट्वीट देखील केले आहे. सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात केलेल्या ट्वीट मध्ये म्हटले आहे की पुण्यात दररोज कुठे ना कुठे गंभीर गुन्हे घडतच आहेत. त्यांवर आळा घालण्यात गृहखात्याला यश आलेले नाही. ही घटना म्हणजे कायदा सुव्यवस्थेची कशा पद्धतीने दुर्दशा झाली याचे प्रत्यंतर देणारी आहे. या प्रकरणातील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवावा अशी आमची मागणी आहे असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा

बलात्काराची घटना ही निंदनीय आहे. पण एसटी डेपोमध्ये सुरक्षारक्षक वाढविण्याची गरज आहे. राज्यातील अनेक एसटी डेपोमध्ये सुरक्षारक्षकांची कमतरता आहे. याची दखल एसटी प्रशासनाने घेतली पाहिजे आणि एसटी डेपोमध्ये आलेल्या प्रत्येक बसची तपासणी ही केली पाहिजे त्याचबरोबर महिलांना देखील एसटी डेपोमध्ये बसण्यासाठी जागा बनवण्यात आली आहे. त्यांनी देखील त्याच जागेचा वापर केला पाहिजे अशा घटना पुन्हा न होण्यासाठी एसटी प्रशासनाने चांगली व्यवस्था उभी केली पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

सराईत गुन्हेगार

दत्तात्रय गाडे असे आरोपीचे  नाव असून तो सराईत गुन्हेगार आहे.  आरोपीची ओळख पटली असून आरोपी शिरुर गावचा आहे. काल त्याच्या घरी शेतात पोलिसांनी डॉग स्क्वॉडच्या मदतीने  तपासणी केली आहे. कालपासून आठ टीम काम करीत आहेत, त्याने ताई म्हणून आवाज दिला आणि या तरुणीशी ओळख करुन घेतली . फलटणची बस वेगळीकडे लागते असे सांगून तो तिला घेऊन गेला आणि नंतर बसचा दरवाजा बंद करुन त्याने तिच्यावर अत्याचार केला आहे. या सगळ्या प्रकारची चौकशी सुरू असल्याचे पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी म्हटले आहे. बसच्या चालक आणि वाहकाने बस अशा ठिकाणी उभी करताना तिचे दरवाजे लॉक का केले नव्हते अशा प्रश्न निर्माण झाला आहे.

Follow Us
61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य..
Raju Shetti On Sugarcane Farmers Protest : 61 तासांच्या आंदोलनाला अखेर यश, 3900 + 100 + 200 चा फॉर्म्युला मान्य; राजू शेट्टींकडून आंदोलन मागे
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
Sharad Pawar Health Update : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार; या नेत्यांकडून भेटीगाठी आणि फोन
आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? तटकरेंच्या विधानावर अनिल....
NCP Merger : आताच का बोलले, तेव्हा कोणाचा दबाव होता? सुनील तटकरेंच्या विधानावर अनिल देशमुखांचा थेट सवाल
गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
Raj Thackeray On Gokul : गोकुळमध्ये रडीचा डाव खेळणं बंद करा; भाजपवर राज ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता...
NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीत उलथापालथ होण्याची शक्यता; त्या बड्या नेत्याच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ
अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं मोठं विधान
Sunil Tatkare : अजितदादा असते तर दोन्ही राष्ट्रवादी...; सुनील तटकरे यांचं  मोठं विधान
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या.....
Devendra Fadnavis Calls Supriya Sule : मुख्यमंत्री फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना फोन; शरद पवारांच्या प्रकृतीची घेतली सविस्तर माहिती
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र...
अजितदादा हयात असते तर 12 फेब्रुवारीलाच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असत्या; सुनील तटकरेंचा मोठा खुलासा!
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ..
शरद पवारांच्या भेटीगाठींवरून रोहित पवारांचा भाजपला सूचक इशारा; पार्थ आणि सुनेत्रा पवारांबाबत काय म्हणाले?