AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्राइंडरचे ब्लेड तुटून युट्यूबर गंभीर जखमी, ब्लेड जबडा फाडून मेंदूपर्यंत घुसले…

घरातील काम सुरू असताना ग्राइंडरचे ब्लेड तुटून थेट चेहऱ्यावर आदळल्याने महा कोकणचे युट्यूबर जगन्नाथ धोंडू गुरव हे गंभीर जखमी झाले आहेत. राजापूर शहरातील गुरववाडी येथे ही घटना घडली.

ग्राइंडरचे ब्लेड तुटून युट्यूबर गंभीर जखमी, ब्लेड जबडा फाडून मेंदूपर्यंत घुसले...
Youth seriously injured after grinder blade snaps in Ratnagiri
| Updated on: Oct 05, 2026 | 5:54 PM
Share

घरात दुरुस्तीचे काम सुरु असताना ग्राईंडरचे ब्लेड तुटून थेट चेहऱ्यावर आदळल्याने एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना रत्नागिरीतील राजापूरात घडली आहे. राजापूरातील गुरववाडी येथे हा अपघात घडला असून यात महा कोकणचे युट्यूबर जगन्नाथ धोंडू गुरव हे गंभीर जखमी झाले आहेत. ग्राईंडरचे ब्लेड अचानक तुटून अत्यंत वेगाने उडाल्याने हे ब्लेड थेट जबडा फाडून मेंदूपर्यंत पोहचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

घरातील कामे सुरु असताना ग्राईंडरचे ब्लेड अचानक तुटून त्याचे लोखंडी पाते अत्यंत वेगाने जगन्नाथ गुरव यांच्या चेहऱ्यात घुसल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या जबड्यात हे पाते शिरुन ते थेट मेंदूपर्यंत गेल्याने त्यांना आधी राजापूरातील एका खासगी रुग्णालयातून कोल्हापूरातील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर पुढील उपचार आता कोल्हापूरात सुरु आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घरात काम सुरू असताना अचानक ग्राइंडरचे ब्लेड तुटले आणि अत्यंत वेगाने उडून जगन्नाथ गुरव यांच्या चेहऱ्यावर आदळले. या दुर्घटनेत त्यांच्या जबड्याला गंभीर दुखापत झाली असून हे ब्लेड त्यांचा जबडा फाडून मेंदूपर्यंत पोहोचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर त्यांना तात्काळ राजापूर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे प्रथमोपचार केल्यानंतर अधिक उपचारांची गरज असल्याने त्यांना कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे. रुग्णाची प्रकृती लक्षात घेता त्यांनी विलंब न करता जगन्नाथ गुरव यांना पुढील उपचारांसाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे. या तरुणाचा जबडा पूर्णपणे चिरला असून जखम खोल मेंदूपर्यंत गेल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे तरुणाला पुढील उपचारासाठी कोल्हापूरातील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

Follow Us
उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; नेमकं काय शिजतंय?
Eknath Shinde in Delhi : उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा, मोदींसोबत भेट; विधानपरिषद निवडणुकीआधी महत्त्वाच्या भेटीगाठी, नेमकं काय शिजतंय?
भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ...
Vidhan Parishad Election : भाजप उमेदवाराचा अर्ज दाखल; पण मित्रपक्षांच्या नेत्यांनी फिरवली पाठ, महायुतीत नेमकं काय सुरू?
मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; काँग्रेस-उबाठा...
Vidhan Parishad Election : मविआत ठरलं नाही अन् ठाकरे गटाने उमेदवार उतरवला; अमरावतीत काँग्रेस-उबाठा आमनेसामने
एल निनोचा धोका, सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
Maharashtra Drought : एल निनोचा धोका, महाराष्ट्रात पाण्याचं मायक्रो प्लॅनिंग; सरकारचा मास्टर प्लॅन नेमका काय?
कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
Sanjay Shirsat : कर्जमाफीवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, एकही शेतकरी....
फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा....
Sachin Kharat On Abhijeet Dipake : फुटीरवादी नेत्यांमुळे आंबेडकरी चळवळीचं नुकसान; सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा, पण खरात असं का म्हणाले?
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
कोल्हापूर अंबाबाई मंदिरात आज दिवसभर देवीच्या मूर्तीचे दर्शन बंद
जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्ष
Ahilyanagar Election : जिल्हा बँक निवडणुकीत राम शिंदेंचा मोठा निर्णय; म्हणाले, पदाची निष्पक्षता जपण्यासाठी...
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी
राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला; आदित्य यांच्या पासपोर्ट जप्तीची मागणी
'राऊतांना मोदींवर टीका करण्याचा अधिकार नाही', परिणय फुकेंचं वक्तव्य
Video :