AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माफ करा पाव्हणं… पण तुमच्या गावात मुलगी नाही देऊ शकत… पुण्यात बिबट्याचा टेरर; मुलांना लग्नासाठी मुलीच मिळेना

पुणे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये बिबट्याच्या दहशतीमुळे एक गंभीर सामाजिक संकट उभे राहिले आहे. बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे मुलींचे पालक या भागातील मुलांशी मुलींचे लग्न करण्यास नकार देत आहेत. यामुळे अनेक सुशिक्षित तरुणांचे विवाह रखडले असून, त्यांना वधू मिळत नाहीत. बिबट्याची ही भीती आता केवळ जीवघेणी राहिलेली नसून, ती एक मोठी सामाजिक समस्या बनली आहे

माफ करा पाव्हणं... पण तुमच्या गावात मुलगी नाही देऊ शकत... पुण्यात बिबट्याचा टेरर; मुलांना लग्नासाठी मुलीच मिळेना
बिबट्याच्या दहशतीमुळे सोयरीक जुळेनाImage Credit source: social media
| Updated on: Nov 12, 2025 | 1:53 PM
Share

आपली मुलं शिकावीत,मोठी व्हावीत, लग्न होऊन त्यांचा सुखाचा संसार व्हावा अशी प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. त्यासाठी ते सतत झटतही असतात. मुलं वयात आली की सुरू होते वधूसंशोधन मोहीम. मुलासाठी छान, मनमिळाऊ, घरी सर्वांना जीव लावणारी,आपलसं रणारी मुलगी शोधून पोराचे हाते पिवळे करायचं आई-वडिलांचं स्वप्न असतं. असंच स्वप्न उत्तर पुणे जिल्ह्यातल्या अनेक गावातील नागरिकांनीही पाहिलं आहे. मुलाचा संसार सुरू झाला की आपण मोकळे असा विचार आई-बापांच्या मनात येत आहे. पण सध्या त्यांच्या भागात फिरणाऱ्या बिबट्यामुळे त्यांच्या णनात दहशत नाही तर तोच बिबट्या एक सामाजिक संकटही ठरत आहे.

माणसांच्या रक्ताला चटावलेला बिबट्या हा लग्नातही मोठा अडथळा ठरत आहे. बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असलेल्या शिरूर तालुक्यामधील गावांत एकाही मुलाची सोयरिक जमेनाशी झाली आहे. लग्नासाठी मुली न मिळाल्याने गावांतील अनेक तरुणांची स्वप्नं अधांतरी लटकलीत. फक्त बिबट्याच्या भीतीमुळे कोणतेच पालक या गावात आपल्या मुली द्यायला धजावत नाहीयेत. त्यामुळे अनेकांची लग्न रखडली आहेत.

राज्यभरात बिबट्याची दहशत, लग्नाला पोरीच मिळेना

सध्या राज्यातील विविध शहरांत, गावांगावात बिबट्याचे दर्शन होत असून अनेक लोकांचे जीवही जात आहेत. पुणे जिल्ह्यातील अनेक गावांतील गावकऱ्यांचे जगणे मुश्किल केले आहे. अगदी आंबेगाव, शिरूर, जुन्नर, खेड या तालुक्यांत खूप भयावह परिस्थिती आहे. लोकांच्या, जनावरांच्या रक्ताला चटावलेला बिबट्या कधी भरवस्तीत घुसून तर कधी सेतातील लोकांना पकडून, कधी गोठयातील गुरांचं नरडं पकडून त्यांना ठार मारून घेऊन जातोय . त्यामुळे इथले गावकरी अगदी दहशताखाली जगतात, जीव मुठीत धरून जगायची वेळ त्यांच्यावर आली आहे. दिवसाढवळ्या बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतात काम करताना बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना गावकरी करत आहेत. मात्र बिबट्याची दहशत केवळ जीवघेणी नव्हे, तर त्यामुळे सामाजिक संकटानेही परिसीमा गाठलीय.

लग्नासाठी मुलींचा नकार

आणि याच गावात अनेक तरूण मुलं असून त्यांची लग्न अद्याप झालेली नाहीत. लग्नासाठी मुली तर पहायला ते तयार आहेत. पण ते वेल सेटल्ड असूनही त्यांना लग्नासाठी होकार मिळत नाहीये. गावात आणि आसपासच्या भागात बिबट्याची दहशत असल्यामुळे कोणतेच पालक या गावांमधील तरूणांशी आपल्या मुलीचं नातं जोडण्यास तयार नाहीत. मुलीही या गावांत येण्यास आणि जीव धोक्यात टाकण्यास नकार देत आहे. लग्नासाठी मुली न मिळाल्याने गावांतील अनेक तरुणांची स्वप्नं अधांतरी लटकलीत. बिबट्यांच्या भीतीपोटी पालकच सोयरिक नाकारतायत, आणि त्यामुळे अनेक तरुण सेटल असूनही त्यांचे विवाह रखडलेत. बिबट्यांच्या धाकानं गावोगाव आता जीवसृष्टीसह सामाजिक आयुष्यही हादरलं आहे.

बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून काही ठिकाणी मुलांना लग्नासाठी मुली देण्यासही पालक नकार देतात. बिबट्याच्या दहशतीमुळे विवाहसंबंधांवर परिणाम होणं हे ग्रामीण भागातलं नवं आणि चिंताजनक वास्तव ठरत असुन बिबट्याचा लवकरच बंदोबस्त होऊन लग्न जुळविण्यातील अडथळे दुर होतील अशी आशा ग्रामस्थांना आहे.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.