AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बारामतीत पुन्हा एकदा काका विरूद्ध पुतण्या? युगेंद्र पवार घेणार मोठा निर्णय!

मोठी बातमी समोर येत आहे, बारामतीमध्ये पुन्हा एकदा काका- आणि पुतण्याची लढत पाहायला मिळू शकते. युगेंद्र पवार यांनी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पॅनल उभारण्याचे संकेत दिले आहेत.

बारामतीत पुन्हा एकदा काका विरूद्ध पुतण्या? युगेंद्र पवार घेणार मोठा निर्णय!
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 15, 2025 | 4:31 PM
Share

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. बारामतीमध्ये आता पुन्हा एकदा काका विरूद्ध पुतण्या लढत पाहायला मिळू शकते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात साखर कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभे करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. साखर कारखाना निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.  दरम्यान युगेंद्र पवार यांच्याकडून आता साखर कारखान्यांची निवडणूक लढवण्याचे संकेत देण्यात आल्यामुळे बारामतीमध्ये पुन्हा एकदा काका आणि पुतण्या आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

नेमकं काय म्हणाले युगेंद्र पवार? 

अजित पवार यांच्याविरोधात साखर कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभं करण्याचे संकेत युगेंद्र पवार यांच्याकडून देण्यात आले आहेत. साखर कारखाना निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, माळेगाव साखर कारखाना, सोमेश्वर साखर कारखाना किंवा एकूण उसाच्या क्षेत्रामध्ये पवारसाहेबांचं फार मोठं योगदान आहे. आज नाही तर गेल्या चाळीस, पन्नास वर्षांपासून पवार साहेब यांचं या क्षेत्रात योगदान आहे. जर पवार साहेब आपल्या पाठिमागे आहेत. तिथे आपल्याकडे सक्षम उमेदवार आहेत आणि जर आपण तो साखर कारखाना वाचू शकतो तर मग निवडणूक लढवायला काय हरकत आहे, असं युगेंद्र पवार यांनी म्हटलं आहे.  त्यामुळे आता युगेंद्र पवार हे माळेगाव साखर कारखाना आणि सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीत आपलं पॅनल उभं करण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास पुन्हा एकदा बारामतीमध्ये काका आणि पुतण्याची लढत पाहायला मिळू शकते.

विधानसभेत पराभव 

युगेंद्र पवार यांनी गेल्यावेळी अजित पवार यांच्याविरोधात बारामती विधानसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील निवडणुकीकडे सर्व राज्याचं लक्ष लागलं होतं. काका-पुतण्याची ही लढत मोठी चुरशीची ठरली, मात्र या निवडणुकीत अजित पवार यांनी युगेंद्र पवार यांचा पराभव केला. दरम्यान आता पुन्हा एकदा काका-पुतण्या आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश