AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपाच्या मोर्चात राडा घालणाऱ्या महिलेच्या अडचणी वाढल्या, झेन सदावर्तेंनी पुढे येत उचललं मोठं पाऊल; नेमकं काय घडणार?

भाजपाने मुंबईत केलेल्या जनआक्रोश मोर्चात एका महिलेने मोठा राडा घातला. या महिलेने रस्ता मोकळा करण्यासाठी गिरीश महाजन यांना चांगलेच सुनावले. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. आता याच महिलेच्या अडचणी वाढल्या आहेत.

भाजपाच्या मोर्चात राडा घालणाऱ्या महिलेच्या अडचणी वाढल्या, झेन सदावर्तेंनी पुढे येत उचललं मोठं पाऊल; नेमकं काय घडणार?
zen sadavarte and bjp protestImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 24, 2026 | 10:14 AM
Share

BJP Protest : नारी शक्ती वंदन तसेच मतदारसंघांची पुनर्रचना करण्याबाबतची दुरुस्ती विधेयके नामंजूर झाल्याने भाजपाने मुंबईत जनआक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चात भाजपाचे अनेक मोठे नेते उपस्थित होते. तसेच भाजपाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी या मोर्चात सहभाग नोंदवला होता. परंतु हा मोर्चा एका महिलेमुळे विशेष चर्चेत आला. फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या एका महिलेने मोर्चात येऊन मोठा राग व्यक्त केला होता. रस्ता मोकळा करा म्हणत तिने मोर्चेकऱ्यांना सुनावले होते. विशेष म्हणजे मंत्री गिरीश महाजन यांनादेखील त्या महिलेने खडे बोल सुनावले होते. दरम्यान, आता या महिलेच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महिलेने अपमानास्पद आणि आक्षेपार्ह विधान केल्याचा दावा करत तिच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

झेन सदावर्ते यांनी दाखल केली तक्रार

भाजपाच्या जनआक्रोश मोर्चात वाद घाल घालणाऱ्या महिलेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी झेन सदावर्ते यांनी वरळी पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. एक महिला आपल्या मर्सिडीजमधून उतरून रस्त्यावर अपमानास्पद शब्दांचा उपयोग करते. तू कोण आहेस. शांत बस. माझ्याशी तू बोलू नको अशा शब्दांचा त्या महिलेने उपयोग केला. हे शब्द फक्त अपमानास्पदच नाहीत तर हे शब्द देशाला मागे घेऊन जाणारे आहेत, असा दावा झेन सदावर्ते यांनी केला आहे.

वाद घालणाऱ्या महिलेसोबत नेमकं काय होणार?

तसेच, मी याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी याबाबत एआयआर दाखल करून तत्काळ करावाई करावी अशी मागणी मी केलेली आहे. त्यामुळे आता भाजपाच्या आंदोलनात वाद घालणाऱ्या महिलेसोबत नेमकं काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या महिलेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर काँग्रेसने भाजपावर सडकून टीका केली होती. भाजपाचा अजेंडा महिलांनीच हाणून पाडला आहे, असा हल्लाबोल काँग्रेसच्या नेत्यांनी केला होता.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...