भाजपाच्या माजी आमदारासोबत भयंकर घडलं, काळी जादू करून… बंगाली बाबाचं सत्य येताच मोठी खळबळ!

ZP Election : सांगलीत या निवडणुकीत काळी जादू केल्याचा आणि भानामतीचा प्रकार समोर आला आहे. यानंतर आता पोलिसांनी कठोर पावले उचलली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

भाजपाच्या माजी आमदारासोबत भयंकर घडलं, काळी जादू करून... बंगाली बाबाचं सत्य येताच मोठी खळबळ!
black magic
Image Credit source: Google
| Updated on: Jan 26, 2026 | 10:05 PM

नगर पालिका, नगर पंचायत आणि त्यानंतर महानगर पालिकांच्या निवडणुकीनंतर आता राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 7 फेब्रुवारीला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी आता प्रचाराला सुरुवात केली आहे. अशातच आता सांगलीत या निवडणुकीत काळी जादू केल्याचा आणि भानामतीचा प्रकार समोर आला आहे. यानंतर आता पोलिसांनी कठोर पावले उचलली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

निवडणुकीत काळ्या जादूचा वापर

ऐन निवडणूकीत सांगलीच्या विटा येथे माजी आमदार सदाशिव पाटील व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या घरासमोर काळा जादूचा करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर भानामतीचे साहित्य टाकणाऱ्या एका बंगाली भोंदू बाबासाहेब स्थानिक व्यक्तीला शोधून नागरिकांनी बेदम चोप दिला आहे. भोंदू बाबासह स्थानिक व्यक्तीची दिंड काढत त्यांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

बंगाली बाबाला दिला चोप

माजी आमदार सदाशिव पाटील व वैभव पाटील यांच्या घरासमोर दुपारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या बंगाली भोंदू बाबासाहेब स्थानिक व्यक्ती मेटकरी याच्याकडून काळा जादूसाठी वापरणारे साहित्य टाकण्यात आले. हा प्रकार सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर समोर आला. यानंतर सदाशिव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी भानामतीचा प्रकार करणाऱ्या बंगाली बाबूसह स्थानिक व्यक्तीला शोधून बेदम चोप देत शहरातून धिंड काढत विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात दिले. आता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

काळ्या जादूमागील कारण अस्पष्ट

ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी आमदाराच्या घरासमोर करण्यात आलेल्या काळ्या जादूच्या प्रकारामुळे विटा शहरात एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार नेमका कोणत्या कारणामुळे करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आता विटा पोलिसांच्याकडून दोघांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संजय बनसोडे यांनी सर्व उमेदवारांनी आवाहन केले की, ‘अधश्रद्धेचा आधार घेऊन कोणीच विजय होऊ शकत नाही. नागरीकांनी अशा गोष्टींची भीती बाळगू नये.’