AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Salman Agha : हे पाकिस्तानच करु शकतं, सलमान आघा असा रन आऊट झाला, पाहा व्हीडिओ

Salman Agha Run Out Controversy Video : पाकिस्तानने क्रिकेट विश्वाला रन आऊट होण्याची नवीन पद्धत दाखवून दिली आहे. व्हीडिओत पाहा पाकिस्तानचा फलंदाज सलमान आघा बांगलादेश विरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान कसा रन आऊट झाला ते.

Salman Agha : हे पाकिस्तानच करु शकतं, सलमान आघा असा रन आऊट झाला, पाहा व्हीडिओ
Salman Agha Run Out ControversyImage Credit source: PTI
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Mar 13, 2026 | 7:38 PM
Share

पाकिस्तान क्रिकेट टीम आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेनंतर एकदिवसीय मालिकेसाठी बांगलादेश दौऱ्यावर आहे. बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यात एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. बांगलादेशने मायदेशातील या मालिकेतील पहिल्या सामन्यात जबरदस्त असा विजय मिळवत 1-0 ने आघाडी मिळवली. त्यानंतर क्रिकेट विश्वाने उभयसंघातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तान क्रिकेटची लाज जाताना पाहिली. उभयसंघातील दुसऱ्या सामन्यात सलमान आघा विचित्र पद्धतीने रन आऊट झाला. आघा रन आऊट झाल्यानंतर संतापला. आघाने मैदानात हेल्मेट आपटला. तसेच पंचांसह हुज्जत घातली. त्यामुळे सलमान आघावर कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सलमानने नक्की काय केलं हे जाणून घेऊयात.

नक्की काय झालं?

सलमान पाकिस्तानच्या डावातील 39 व्या ओव्हरमध्ये रन आऊट झाला. बांगलादेशकडून मेहदी हसन ओव्हर टाकत होता. तर सलमानसोबत मोहम्मद रिझवान खेळत होता. हसनने या ओव्हरमधील टाकलेला चौथा बॉल रिझवान हलूच खेळला. त्यानंतर नॉन स्ट्राइक एंडवर (अंपायरच्या बाजूला) असलेला आघा क्रीझच्या बाहेर आला. रिझवानने हलूच खेळलेला बॉल सलमानच्या दिशेने आला. कहर म्हणजे सलमानने क्रीझ बाहेरुनच बॉल थांबवला. सलमानने क्रीझ बाहेर असतानाही बॉल उचलून देण्याचा प्रयत्न केला. इथेच सलमानचा गेम झाला. मेहदी हसन याने झटकन बॉल उचलला आणि क्षणाचा विलंब न करतान सलमानला रन आऊट केलं.

सलमानची सटकली, भर मैदानात हेल्मेट फेकला

मेहदीने रन आऊट केल्यानंतर सलमान हुज्जत घालायला लागला. सलमान आपण आऊट नसल्याच्या भ्रमात होता. मात्र थर्ड अंपायरनेही सलमान आऊट असल्याचंच जाहीर केलं. सलमानला हा निर्णय काय पटला नाही. त्यामुळे सलमान संतापला. सलामाने रागाच्या भरात हेल्मेट आणि त्यानंतर ग्लोव्हज फेकले.

आता सलमानवर कारवाई फिक्स!

आता सलमानला पंचांवर संतापणं तसेच हेल्मेट-ग्लोव्हज फेकणं चांगलंच महागात पडणार असल्याचं म्हटलं जात आहे. आयसीसीच्या आचार संहितेनुसार, लेव्हल 1 आणि 2 नुसार सलमानवर कारवाई होऊ शकते. आयसीसी आचार संहितेच्या लेव्हल 1-2 मध्ये पंचांशी वाद घालणे आणि क्रिकेट साहित्य फेकणाऱ्या विरोधात कारवाईची तरतूद आहे. त्यामुळे सामनाधिकारी याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सलमानच्या बांगलादेश विरुद्ध किती धावा?

सलमानने केलेल्या मुर्खपणामुळे त्याच्या खेळीचा शेवट झाला. सलमानने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 62 बॉलमध्ये 64 रन्सची खेळी केली. सलमानने या दरम्यान 7 चौकार आणि 2 षटकार लगावले.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल