Stock Market : पैसे न गुंतवता शेअर मार्केटमधून करा कमाई; जाणून घ्या खास योजना!

तुम्हाला माहित आहे का की, शेअर बाजारातून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला पैसे गुंतवण्याची गरज नाही. पैसे न गुंतवता पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. या कामासाठी जास्त गुंतवणूक करावी लागत नाही. त्याच वेळी, शेअर बाजारातील या स्किमला तुम्ही, साइड बिझनेस म्हणून देखील पाहू शकता.

Stock Market : पैसे न गुंतवता शेअर मार्केटमधून करा कमाई; जाणून घ्या खास योजना!
Image Credit source: TV9
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मनोज कुलकर्णी

Apr 24, 2022 | 2:44 PM

जास्तीत जास्त पैसे कमविण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी शेअर बाजार (Stock market) हे एक मोठे आकर्षण आहे. स्वतःचा फायदा करून इतरांनाही परतावा मिळण्याचे स्वप्न शेअर बाजारीत लोक पाहतात. मात्र, बाजाराचे आकलन (Market assessment) नसल्याने आणि बाजारात गुंतवायला पैसे नसल्याने त्यांना बाजाराचा फायदा घेता येत नाही. पण, तुम्हाला माहित आहे का की, मार्केटमधून पैसे कमवण्यासाठी तुम्हाला पैसे गुंतवण्याची गरज नाही. पैसे न गुंतवता पैसे कमावण्याचे अनेक मार्ग आहेत. शेअर बाजाराची चांगली माहिती मिळवित तुम्ही या खास योजनांचा लाभ घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला असे दोन मार्ग सांगणार आहोत जिथे तुम्ही कोणतेही पैसे न गुंतवता (Without investing money) मार्केट समजून घेऊन तुमचे पैसे कमवू शकता. त्याच वेळी, एकदा का तुम्हाला मार्केट समजले की, तुम्ही तुमचे काम करू शकता.

रेफर आणि अर्न

शेअर बाजाराचा हा पर्याय अशा लोकांसाठी आहे ज्यांना शेअर बाजाराचे थोडेसे ज्ञान आहे आणि ते ब्रोकिंग फर्मचा व्यवसाय पसरवण्यासाठी या मूलभूत ज्ञानाचा फायदा घेऊ शकतात. हा एक प्रकारचा साईड बिझनेस आहे, जो तुम्ही तुमच्या वेळेनुसार करू शकता, खरं तर या प्रोग्राम अंतर्गत तुम्हाला ब्रोकिंग फर्म्सना त्यांचे डीमॅट खाते उघडण्यासाठी मदत करावी लागेल. त्या बदल्यात तुम्हाला रोख रक्कम आणि इतर ऑफर्स मिळतात, वेगवेगळ्या ब्रोकिंग फर्म वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत. कोटक सिक्युरिटीज यासाठी, प्रति खाते रु 500 देते आणि तुम्ही उघडलेल्या खात्यात तुम्हाला ट्रेडिंग करताना मिळणाऱ्या ब्रोकरेजचा काही भाग देते. यासोबतच एचडीएफसी सिक्युरिटीज आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज देखील अशा योजना चालवितात. ज्यामध्ये रोख रकमेसह इतर ऑफर्स समाविष्ट आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या ब्रोकिंग फर्म दर महिन्याला ठराविक वेळेपर्यंतच नफा देतात, त्यामुळे या कामात दरमहा कमाईची मर्यादा आहे, परंतु बाजार समजून घेताना हे प्रोत्साहनपर राहू शकते.

शेअर मार्केट भागीदारी

आर्थिक बाजाराचे ज्ञान असलेले लोक ब्रोकिंग फर्मशी जोडून त्यांच्या ग्राहकांना व्यापार सुविधा देऊन किंवा ब्रोकिंग फर्मच्या इतर आर्थिक उत्पादनांची विक्री वाढवून पैसे कमवू शकतात. तुम्ही लोकांना शेअर ट्रेडिंग करण्यास मदत करू शकता आणि त्या बदल्यात तुम्ही तुमचे उत्पन्न वाढवू शकता. जवळपास सर्व ब्रोकिंग फर्म अशा ऑफर देत आहेत. ICICI संचालक अधिकृत व्यक्ती (AP), स्वतंत्र वित्तीय सहयोगी (IFA), गुंतवणूक सहयोगी आणि कर्ज भागीदार बनण्याच्या संधी देत आहे. एपी वगळता, तुम्हाला इतर सर्व गोष्टींसाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही, तुम्हाला कार्यालय बांधण्याची गरज नाही किंवा तुम्हाला जास्त अनुभवाचीही गरज नाही. वेगवेगळ्या ब्रोकिंग फर्म वेगवेगळ्या नावाने ही योजना चालवत आहेत. शिवाय, ते आवश्यक प्रशिक्षणही देतात. तुम्हालाही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर तुम्ही ब्रोकिंग फर्मसोबत आर्थिक उत्पादने विकू शकता, हे काम रेव्हेन्यू शेअरिंगवर आधारित आहे, म्हणजेच तुम्ही जितका जास्त व्यवसाय कराल तितके तुमचे स्वतःचे उत्पन्न वाढेल. त्याचबरोबर हे काम तुम्ही साइड बिझनेस म्हणूनही करू शकता.
इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Mirza Ghalib | जगण्याचं तत्वज्ञान मलमली भाषेत सांगणाऱ्या असदुल्लाह-ख़ाँ-‘ग़ालिब’ का पता…!

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें