BEST STRIKE: संप चालू ठेवून तोडगा कसा काढणार? हायकोर्टाने झापलं

मुंबई: बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या सातव्या दिवशी मुंबई हायकोर्टाने संपकरी कर्मचाऱ्यांना चांगलंच झापलं. समिती स्थापन झाल्यानंतर संप मागे घेणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही. संप करुन तडजोडीची चर्चा करणं योग्य नाही, असे ताशेरे आज कोर्टाने कर्मचाऱ्यांवर ओढले.  “आम्ही तुम्हाला एक प्लॅटफार्म दिला होता, पण तुम्ही काही तोडगा काढला नाही. तुम्हाला फक्त मनमानी करायची आहे, अशा शब्दात कोर्टाने …

BEST STRIKE: संप चालू ठेवून तोडगा कसा काढणार? हायकोर्टाने झापलं

मुंबईबेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या सातव्या दिवशी मुंबई हायकोर्टाने संपकरी कर्मचाऱ्यांना चांगलंच झापलं. समिती स्थापन झाल्यानंतर संप मागे घेणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही. संप करुन तडजोडीची चर्चा करणं योग्य नाही, असे ताशेरे आज कोर्टाने कर्मचाऱ्यांवर ओढले.  “आम्ही तुम्हाला एक प्लॅटफार्म दिला होता, पण तुम्ही काही तोडगा काढला नाही. तुम्हाला फक्त मनमानी करायची आहे, अशा शब्दात कोर्टाने संपकरी कर्मचाऱ्यांना सुनावलं. याप्रकरणी पुन्हा दुपारी तीन वाजता सुनावणी होणार असून, त्यासाठी कोर्टाने महाधिवक्ता यांना बोलावलं आहे.

कोर्टाचे ताशेरे

या सुनावणीदरम्यान हायकोर्ट म्हणालं, “आमच्या समिती स्थापन करण्याच्या आदेशाचा आधार घेऊन तुम्ही संप कायम ठेवावा असं आम्ही म्हटलं नव्हतं. समिती स्थापन झाल्यावर तुम्ही संप मागे घ्याल अशी आमची अपेक्षा होती.संपावर कायम राहून तडजोडीची चर्चा करणं योग्य नाही”.  राज्य सरकार आणि महानगरपालिका मिळून काही तोडगा काढता येतो का हे ठरवा, असं कोर्टाने नमूद केलं.

बेस्ट प्रशासन काय म्हणालं?

बेस्ट प्रशासन चर्चा करायला तयार, पण संपाच्या नावानं आम्हाला धमकावणं चुकीचं

संप मागे घ्यावा, चर्चा करून मार्ग काढू, बेस्ट प्रशासनाची मागणी

बेस्ट वकील- कोर्टाने आधी संप मागे घेण्याचे आदेश द्यावेत, आम्ही चर्चेला तयार आहोत.

संपकरी कर्मचाऱ्यांची मागणी

आम्हाला अजून काहीच ऑफर प्रशासनाकडून दिली नाही. कामगरांच्या खूप अडचणी आहेत. आम्हाला काहीतरी ऑफर दिली पाहिजे, असा युक्तीवाद कर्मचारी युनियनच्या वकिलांनी केला.

दरम्यान आजच्या सुनावणीला कर्मचारी युनियनचे नेते शशांक राव अनुपस्थित होते.

बेस्ट संपाचा आजचा 7 वा दिवस आहे तरीही यावर काहीच तोडगा निघालेला नाही. त्यासाठी आज मुंबईत सचिवांची बैठक घेण्यात आली. पण त्यातही कोणताच तोडगा निघाला नाही. मुख्य सचिवांनी बोलावलेली बैठक संपली. पण बेस्ट संपावर बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.

संबंधित बातम्या

बेस्टच्या संपाचा सातवा दिवस, अद्याप कोणताही तोडगा नाही

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *