आतापर्यंत 19 जणांना covishield लसीचा डोस, मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयात चाचणी सुरु

कोव्हिशिल्डच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयात सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 19 जणांना ही लस देण्यात आली आहे. (Covishield vaccine third phase clinical trial started in mumbai )

आतापर्यंत 19 जणांना covishield लसीचा डोस, मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयात चाचणी सुरु
Follow us
| Updated on: Oct 02, 2020 | 5:16 PM

मुंबई: कोरोना विषाणूवरिल लस कोव्हिशिल्डच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयात सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 19 जणांना ही लस देण्यात आली आहे.ऑक्सफर्ड आणि सीरम इन्स्टीट्युट यांच्या मार्फत कोव्हिशिल्ड लस बनवण्यात येत आहे.(Covishield vaccine third phase clinical trial started in Mumbai)

मुंबईतील केईएम रुग्णालयात आणि नायर रुग्णालयात 100 अशा एकूण 200 जणांना तिसऱ्या टप्प्यातील लस देण्यात येणार आहे. नायर रुग्णालयात कोव्हिशिल्ड लसीची चाचणी सुरु झालीय. आतापर्यंत 19 जणांना लस देण्यात आली आहे. टप्प्याटप्प्याने 100 जणांना लस देण्यात येणार आहे. लसीच्या चाचणीसाठी स्वंयसेवकांनी पुढे यावे, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले होते. रुग्णालयाच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. कोव्हिशिल्ड लसीच्या चाचणीसाठी 150 स्वंयसेवकांनी नोंदणी केली. आरटी-पीसीआर आणि अ‌ॅण्टिबॉडीज चाचणी करुन 100 स्वयंसेवकांची निवड करण्यात येणार आहे. मुंबईसह, पुणे, नागपूर म्हैसूर, चेन्नई येथील विविध रुग्णालयात कोव्हिशिल्ड लसीची चाचणी करण्यात येत आहे.

लसीचा दिलेल्या स्वंयसेवंकाची 1 महिन्यानंतर पुन्हा चाचणी

कोव्हिशिल्ड लस देण्यात आलेल्या 100 स्वंयसेवकांची एका महिन्यानंतर तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर येणाऱ्या निष्कर्षांवरुन पुढील प्रक्रिया निश्चित केली जाणार आहे.

भारतात तीन लसींची चाचणी सुरु

ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि सीरम इन्स्टिट्युट यांच्या मार्फत कोव्हिशिल्ड तिसऱ्या टप्प्यात आहे. भारत बायोटेक इंटरनॅशनल संस्था बनवत असलेली ‘कोवॅक्सीन’ लस मानवी चाचणीच्या दुसऱ्या टप्प्यात आहे. झायडस कॅडिला ही संस्था देखील लस बनवत असून त्यांच्याही लसीची चाचणी सुरु आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सीरम इन्स्टीट्युटला भेट दिली. यानंतर पत्रकारांशी बोलताना लस यायला जानेवारी उजाडेल, असे सांगितले.

संबंधित बातम्या:

Oxford Vaccine | मुंबईत ऑक्सफर्डच्या लसीची चाचणी सुरु

Oxford Vaccine Test | ऑक्सफर्ड लसीची मुंबईच्या केईएम, नायर रुग्णालयात चाचणी

Covishield vaccine third phase clinical trial started in Mumbai

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.