रस्त्यावर मोकाट जनावर दिसल्यास मालकाला 10 हजारांचा दंड

मुंबईत मोकाट फिरणाऱ्या गाई, बैल, म्हैस आदींच्या उपद्रवामुळे पादचाऱ्यांनाच नव्हे तर वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण (Fine increase for cattle on road)  होतो.

Fine increase for cattle on road, रस्त्यावर मोकाट जनावर दिसल्यास मालकाला 10 हजारांचा दंड

मुंबई : मुंबईत मोकाट फिरणाऱ्या गाई, बैल, म्हैस आदींच्या उपद्रवामुळे पादचाऱ्यांनाच नव्हे तर वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण (Fine increase for cattle on road)  होतो. त्यामुळे या प्रकाराची गंभीर दखल मुंबई महानगर पालिकेने घेतली आहे. त्यासोबतच मोकाट फिरणाऱ्या जनावरांवरील दंडात्मक कारवाईचा बडगा अधिक तीव्र करण्यात येणार आहे. मोकाट जनावरांच्या मालकांकडून प्रति जनावर 10 हजार रुपये दंड आकारण्याची तयारी पालिकेने सुरू (Fine increase for cattle on road) केली आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला गाय-बैलांना बांधून ठेवले जाते. शेण आणि गोमूत्रामुळे पदपथावर अस्वच्छता होते. दररोज सकाळी काही महिला गाय आणि चाऱ्याची टोपली घेऊन मंदिराजवळ अथवा सार्वजनिक ठिकाणी बसून असतात. गाईला चारा भरविण्याच्या निमित्ताने भाविक मंडळी तेथे गर्दी करतात. त्यानंतर दुपारच्या वेळी या महिला गाईंना घेऊन निघून जातात. मात्र गोठ्याच्या दिशेने निघालेल्या गाई मोकाट सुटतात आणि त्यांचा वाहतुकीला अडथळा निर्माण होतो.

मोकाट फिरणाऱ्या जनावरांची पालिकेतर्फे धरपकड केली जाते. अशा जनावरांची रवानगी पालिकेच्या कोंडवाडय़ात केली जाते. त्यानंतर जनावराचे मालक दंडाची रक्कम भरुन जनावर सोडवून घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. याची दखल घेऊन नगरसेविका नेहल शाह यांनी दंडाची रक्कम वाढवावी, अशी मागणी पालिका सभागृहात ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती.

याची दखल घेत पालिका प्रशासनाने दंडाची रक्कम 10 हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा प्रस्तावही तयार करण्यात आला असून या प्रस्तावाला पालिका सभागृहाकडून मंजुरी मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. यामुळे जनावरांना मोकाट सोडणाऱ्या मालकांमध्ये जरब बसवता येणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *