Ganeshotsav 2020 | गणेशमूर्तींची उंची किती असावी? मुख्यमंत्री लवकरच जाहीर करणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा (CM Uddhav Thackeray Ganesh Murti Height limit) केली.

Ganeshotsav 2020 | गणेशमूर्तींची उंची किती असावी? मुख्यमंत्री लवकरच जाहीर करणार

मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा गणेशमूर्तीची उंची कमी करुन उत्सवाची उंची वाढवूया असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. नुकतंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी सार्वजनिक गणेशमूर्तींच्या उंचीबाबत निर्णय येत्या दोन दिवसात जाहीर करु असे सांगितले. (Ganeshotsava 2020 CM Uddhav Thackeray Ganesh Murti Height limit)

“यंदा गणेशमूर्तींची उंची किती असावी या संदर्भात मी आपल्या सर्वांशी बोललो आहे. तसेच आता मी मुंबई महापालिका आयुक्त आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याशी बोलणार आहे. पुढील दोन दिवसांत गणेश मूर्तींची उंची किती असावी? याबाबतचा निर्णय जाहीर करेन,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

“आपल्याला लोकमान्य टिळकांची परंपरा पुढे न्यायची आहे. पण ती सुरक्षित व्हायला पाहिजे. यंदा गणेशमूर्ती दोन जणांना उचलता येईल अशीच बनवावी. जेणे करुन सुरक्षेचे तसंच इतर प्रश्नही सुटतील,” असेही उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

“विघ्नहर्त्याचे आशिर्वाद घेऊन आपण हे संकट दूर केलं पाहिजे. गणेशमूर्ती एवढ्या उंचीची असावी जेणेकरुन ती कृत्रिम तलावात सुरक्षितपणे विसर्जित करता येईल,” असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

“जर उद्या तुम्ही उत्सव केला आणि तो विभागच कंटेन्मेंट झोन झाला. तर मग अनेक अडचणी उभ्या राहतील. त्यामुळे सुरक्षित उत्सव केला पाहिजे,” असा सल्लाही उद्धव ठाकरेंनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिला.

“मी मुख्यमंत्री झाल्यावर एका पाठोपाठ संकट येत आहेत. मी कुठल्याही वादळाला आणि संकटाला घाबरत नाही. आता आपली परीक्षा आहे. विघ्नहर्ताही आपल्याकडे पाहत असतील की आपण काय शिकलो आणि कसं वागतोय,” असेही ते म्हणाले.

“होळीनंतर हे संकट सुरु झालं आहे. त्यानंतर सर्व धर्मियांनी काळजी घेत सहकार्य केलं आहे. यंदाची आषाढी वारी आपण सुरक्षित पार पाडतो आहे. तसंच आपण गणेशोत्सवही सुरक्षित पार पडला पाहिजे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले. (Ganeshotsava 2020 CM Uddhav Thackeray Ganesh Murti Height limit)

संबंधित बातम्या : 

Ganeshotsava 2020 | सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत बैठक, गणेशोत्सवासाठी मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे आवाहन

यंदाचा सार्वजनिक गणेशोत्सव साधेपणाने, पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांचा स्तुत्य निर्णय

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *