ओबीसी आरक्षण कायदेशीर की बेकायदेशीर? सुनावणीची तारीख ठरली!

मुंबई : इतर मागास वर्ग अर्थात ओबीसी आरक्षण रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी मुंबई हायकोर्टात केली आहे. या याचिकेवर आता 21 जानेवारी 2019 रोजी सुनावणी होणार आहे. या दिवशी आता ओबीसी आरक्षणासंदर्भात हायकोर्टाचा निर्णय काय आहे, हे कळणार आहे. त्यामुळे 21 जानेवारीच्या सुनावणीकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. …

ओबीसी आरक्षण कायदेशीर की बेकायदेशीर? सुनावणीची तारीख ठरली!

मुंबई : इतर मागास वर्ग अर्थात ओबीसी आरक्षण रद्द करा, अशी मागणी करणारी याचिका मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी मुंबई हायकोर्टात केली आहे. या याचिकेवर आता 21 जानेवारी 2019 रोजी सुनावणी होणार आहे. या दिवशी आता ओबीसी आरक्षणासंदर्भात हायकोर्टाचा निर्णय काय आहे, हे कळणार आहे. त्यामुळे 21 जानेवारीच्या सुनावणीकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.

बाळासाहेब सराटे यांनी याचिकेतून काय मागणी केलीय?

20 डिसेंबर 2018 रोजी मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत, ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण अभ्यास न करता दिल्याने ते रद्द करण्याची मागणी याचिकेतून केली होती.

इतर मागास वर्ग अर्थात ओबीसी आरक्षणाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले आहे. “ओबीसींना देण्यात आलेले आरक्षण कोणतेही सर्वेक्षण किंवा अभ्यास न करता देण्यात आल्याने ते रद्दबातल करावे.”, अशी मागणी करणारी जनहित याचिका बाळासाहेब सराटे यांनी मुंबई हायकोर्टात केली आहे.

तसेच, सध्याचे आरक्षण रद्द करुन ओबीसींमधील जातींचे नव्याने आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण राज्य मागासवर्ग आयोगाकडून तपासण्यात यावे, अशीही मागणी सराटे यांनी याचिकेतून केली आहे.

OBC आरक्षण देताना सर्व्हे गरजेचा, सराटेंच्या मागणीत तथ्य : सरकारी वकील

ओबीसी आरक्षण रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करणाऱ्या मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटेंबाबत हायकोर्टात कालही (9 जानेवारी) अत्यंत मोठी घडामोड घडली होती. कोणतेही आरक्षण देताना त्यापूर्वी सर्वेक्षण करण्याची गरज असते, या बाळासाहेब सराटे यांच्या म्हणण्यात काही प्रमाणात तथ्य आहे, असे सरकारी वकिलांनी कोर्टात माहिती दिली.

कोण आहेत बाळासाहेब सराटे?

  • बाळासाहेब सराटे हे मराठा आरक्षणाचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात.
  • त्यांनी मराठा आरक्षणाची अभ्यासपूर्ण मांडणी केली आहे.
  • त्यांनी अनेक वर्ष मराठा आरक्षणाच्या तांत्रिक बाबी मांडल्या.
  • मात्र बाळासाहेब सराटेंवरच मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली होती.
  • आरक्षण सर्व्हेचं काम सराटेंच्या एजन्सीला दिल्याने त्यांच्यावर हल्ला झाला होता.
  • सराटे हे संघाचे समर्थक असून ते मराठा आरक्षणाविरोधात काम करत असल्याचा आरोप त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाने केला होता.
  • मात्र गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणाबाबतच्या लढ्यापासून लांब राहिलेले बाळासाहेब सराटे पुन्हा सक्रीय झाले आणि त्यांनी कायद्याच्या कसोटीवर लढाई सुरु केली.

संबंधित बातम्या :

… तर ओबीसींचं सगळं आरक्षण निघून जाईल : बाळासाहेब सराटे

मराठा आरक्षण : घुसखोरी नको, अन्यथा ओबीसी शांत बसणार नाही : सचिन माळी

मराठ्यांना 16 टक्के आरक्षण, महाराष्ट्रातील आरक्षणाची सद्यस्थिती काय?

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *