मंदिर, रेस्टॉरंट मर्यादित क्षमतेने सुरु करण्याचा विचार, लोकल रेल्वेबाबत निर्णय नाही

येत्या काही दिवसात रेस्टॉरंट आणि मंदिरं मर्यादित क्षमतेनं सुरु करण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. temples and restaurant may open soon)

मंदिर, रेस्टॉरंट मर्यादित क्षमतेने सुरु करण्याचा विचार, लोकल रेल्वेबाबत निर्णय नाही
Follow us
| Updated on: Sep 11, 2020 | 11:27 AM

मुंबई : येत्या काही दिवसात रेस्टॉरंट आणि मंदिरं मर्यादित क्षमतेनं सुरु करण्याचा विचार राज्य सरकारचा आहे. टास्क फोर्सच्या बैठकीत याबाबत चर्चा झाली. येत्या 3 ते 4 दिवसात याबाबतचा ठोस निर्णय होण्याची चिन्हं आहेत. असं असलं तरी मुंबईकरांना लोकल रेल्वेसाठी अद्याप वाट पाहावी लागणार आहे. कारण लोकल सुरु करण्याबाबत राज्य सरकार अद्याप तयार नसल्याचं कळतंय. (temples and restaurant may open soon)

दरम्यान राज्यातील मंदिरांसाठी ई-दर्शनाच्या माध्यमातून मर्यादित संख्येनं देवदर्शन करता येऊ शकेल, अशी पद्धत अवलंबण्याबाबत टास्क फोर्समध्ये चर्चा झाली. ई-दर्शन किंवा मंदिरात जाण्याची वेळ बूक करता येऊ शकेल, त्यानुसार मंदिरातील गर्दी टाळता येईल.

रेस्टॉरंटमध्ये पार्सलव्यक्तिरिक्त 10 टक्के क्षमतेची बैठक व्यवस्था अर्थात सीटिंग अरेंजमेंटमध्ये रेस्टॉरंट सुरु करण्याबाबत विचार आहे.

लोकल रेल्वे वेटिंगवर

मुंबईतील लोकल सुरु होण्यास अजून वाट बघावी लागणार आहे. जोपर्यंत मुंबईच्या आजूबाजूचा परिसर, एमएमआर भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत नाही, तोपर्यंत मुंबईतील लोकल सुरु होण्याची शक्यता कमी आहे.

शाळा सुरु करण्यासंदर्भातही टास्क फोर्सच्या बैठकीत चर्चा झाली, मात्र अद्याप कोणताही निर्णय नाही. लोकलप्रमाणेच शाळा सुरु होण्यासही काही काळ वाट बघावी लागणार आहे.

कोरोना संकटामुळे राज्यात 24 मार्चपासून लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनलॉकिंग आणि मिशन बिगिन अंतर्गत अनेक सेवा सुरळीत झाल्या. मात्र मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल रेल्वे अजूनही बंद आहे. त्याचा ताण रस्ते वाहतुकीवर पडत आहे. त्यामुळे मुंबईकर ट्रॅफिक जॅमने हैराण झाले आहेत.

(temples and restaurant may open soon)

संबंधित बातम्या 

Maharashtra Mission Begin Again | केंद्राची परवानगी, मात्र महाराष्ट्रात हॉटेल-प्रार्थनास्थळांवर बंदी कायम 

Maharashtra Mission Begin Again | तीन टप्प्यात शिथिलता येणार, कोणत्या टप्प्यात काय सुरु? 

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.