AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चार दिवसात अंदाजे 20 हजार प्रवासी मुंबई-पुण्यात परतले, परप्रांतिय मजूर परतण्यास सुरुवात?

लॉकडाऊनमधील शिथिलता मिळाल्यानंतर परराज्यात गेलेले मजूर पुन्हा मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रात परतत असल्याचं चित्र आहे. (migrant workers returning Mumbai)

चार दिवसात अंदाजे 20 हजार प्रवासी मुंबई-पुण्यात परतले, परप्रांतिय मजूर परतण्यास सुरुवात?
आता मोदी सरकार छोट्या व्यावसायिकांना भारतीय रेल्वेसोबत (Indian Railway) काम करून पैसे कमावण्याची सुवर्णसंधी देत आहे.
| Updated on: Jun 08, 2020 | 2:34 PM
Share

मुंबई : लॉकडाऊनमधील शिथिलता मिळाल्यानंतर परराज्यात गेलेले मजूर पुन्हा मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रात परतत असल्याचं चित्र आहे. (migrant workers returning Mumbai) कारण अवघ्या चार दिवसात परराज्यातून आलेल्या रेल्वेंमधून अंदाजे 20 हजार लोक महाराष्ट्रात परतले आहेत. कोरोना संकटामुळे लॉकडाऊनदरम्यान परप्रांतिय मजूर आपआपल्या गावी गेले होते. मात्र हळूहळू ते पुन्हा परतू लागल्याचं चित्र आहे.

वाराणसी-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही 01094 क्रमांकाची रेल्वे काल 7 जूनला मुंबईत निर्धारित वेळेत पोहोचली. या रेल्वेने 594 प्रवासी मुंबईत आले. यापैकी 163 कल्याण, 198 ठाणे, 210 दादर आणि 23 प्रवासी सीएसएमटीवर उतरले. या स्थानकांवर संबंधित मनपा, जसे कल्याण डोंबिवली, ठाणे आणि बीएमसीने सर्व प्रवाशांचं थर्मल स्क्रीनिंग करुन, होम क्वारंटाईनचा शिक्का मारला.

3 जून ते 7 जून या चार दिवसात जवळपास 20 प्रवासी रेल्वेने मुंबई आणि उपनगरात आले आहेत. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेने आतापर्यंत 60 गाड्या सोडल्या. या विशेष रेल्वेमधून जवळपास 20 हजार प्रवासी मुंबईत दाखल झाले. तर पुण्यात तीन रेल्वे दाखल झाल्या असून, तिथे 1200 प्रवासी उतरले.

मजूर अद्याप परतले नाहीत : नसीम खान दरम्यान, काँग्रेस नेते नसीम खान यांनी, स्थलांतरित मजूर अद्याप परतेलच नसल्याचा दावा केला आहे. हे मजूर लवकर परतण्याची शक्यता कमी आहे. कारण लॉकडाऊननंतर आता मुंबईत पाऊस सुरु होईल, लोकांच्या हाताला काम नाही. चालत जे गेले आहेत, ते काही काळ तिकडेच थांबून सर्व काही सुरळीत झाल्यानंतरच येतील, असं नसीम खान म्हणाले. जे लोक लॉकडाऊनपूर्वी आधीच जाऊन तिकडे अडकले होते, ते आता मुंबईत परतत आहेत, असंही नसीम खान यांनी नमूद केलं.

मजुरांच्या नोंदी ठेवा : मनसे दुसरीकडे जे परप्रांतिय मजूर मुंबईत परतत आहेत त्यांच्या नोंदी ठेवून संपूर्ण माहिती सरकारकडे नोंदवा अशी मागणी मनसेने केली आहे. या सर्व मजुरांची माहिती पोलीस स्टेशनमध्ये असावी, तसंच कामगार कायद्यानुसार काम व्हावं, अशी मागणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी केली.

(migrant workers returning Mumbai)

कोणत्या स्टेशनवर किती प्रवासी उतरले? (एका रेल्वेचा तपशील) 

              3 जून     4 जून          5 जून           6 जून            7 जून

CSMT –  80          40               32                 30                23

दादर  –   495        160            118                160               210

ठाणे –                   202            –                    232                198

कल्याण –  196       178            197              168                  163

एकूण       721       560          347            450               594   

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.