सर्वात आव्हानात्मक पल्ला पार! ‘मेट्रो 3’ मार्गावर एकाच टप्प्यात सलग 4 किमी भुयारीकरण पूर्ण

'मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन'द्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुंबई सेंट्रलपर्यंतचा भुयारीकरणाचा महत्त्वाचा 28 वा टप्पा काल पार पडला (Mumbai Metro Underground Work)

सर्वात आव्हानात्मक पल्ला पार! 'मेट्रो 3' मार्गावर एकाच टप्प्यात सलग 4 किमी भुयारीकरण पूर्ण
प्रतिकामत्मक छायाचित्र
Follow us
| Updated on: May 01, 2020 | 9:31 AM

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या ‘मेट्रो 3’ मार्गावर ‘सीएसएमटी’ ते मुंबई सेंट्रलपर्यंत भुयारीकरणाचा 28 वा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे. एकाच टप्प्यात सलग चार किलोमीटर अंतराचे भुयारीकरण करणारे वैतरणा 2 हे ‘मेट्रो 3’चे पहिले टीबीएम (Tunnel boring machine किंवा बोगदा खोदणारे यंत्र) ठरले. (Mumbai Metro 3 Underground Work)

‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’द्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुंबई सेंट्रलपर्यंतचा भुयारीकरणाचा महत्त्वाचा 28 वा टप्पा काल पार पडला. 26  महिन्यांमध्ये सलग चार किमी अंतराचे भुयारीकरण करण्यात आले. प्रतिदिन 6.3 मीटर वेगाने हे काम सुरु होते.

पॅकेज 2 च्या वैतरणा 2 या टीबीएमद्वारे भुयारीकरणाला फेब्रुवारी 2018 मध्ये सीएसएमटी लॉचिंग शाफ्ट येथून सुरुवात झाली होती. एकूण 2730 काँक्रीट रिंग्जचा वापर करत मेट्रो 3 मार्गिकेवरील मुंबई सेंट्रलपर्यंतचा सर्वात जास्त अंतराचा पल्ला वैतरणा 2 टीबीएम ने गाठला.

पॅकेज 2 अंतर्गत येणारा भाग हा समुद्र किनाऱ्याला समांतर होता. तसेच या मार्गावर अनेक जीर्ण आणि जुन्या इमारतींचा समावेश आहे. या भागात भूगर्भातील पाण्याची पातळी एक ते चार मीटर इतक्या जवळ अंतरावर होती. त्यामुळे मार्गिकेतील भुयारीकरणाचा हा टप्पा सर्वात आव्हानात्मक होता.

कोविड19 च्या साथीमुळे हे काम अधिकच आव्हानात्मक झाले होते. मात्र राज्य शासनाच्या सर्व मार्गदर्शन सूचनांचे कठोर पालन करुन शारीरिक अंतर ठेवत हे काम पूर्ण केले, अशी प्रतिक्रिया ‘मेट्रो 3’ मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल यांनी दिली.

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो 3 मार्गिकेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुंबई सेंट्रल दरम्यान चार किमी भुयारीकरणाअंतर्गत सीएसएमटी, काळबादेवी, गिरगाव, ग्रँट रोड आणि मुंबई सेंट्रल या पाच भूमिगत स्थानकांचा समावेश आहे.

(Mumbai Metro 3 Underground Work)

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.