Tulsi Lake Overflow | मुंबईकरासाठी आनंदाची बातमी, तुळसी तलाव ओव्हर फ्लो

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी सर्वात लहान तलाव अशी ओळख असलेला तुळशी तलाव ओव्हरफ्लो झाला (Mumbai Tulsi Lake Overflow) आहे.

Tulsi Lake Overflow | मुंबईकरासाठी आनंदाची बातमी, तुळसी तलाव ओव्हर फ्लो
Follow us
| Updated on: Jul 29, 2020 | 12:12 AM

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी सर्वात लहान तलाव अशी ओळख असलेला तुळशी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. आज दुपारी 12 च्या सुमारास हा तलाव पूर्ण भरुन वाहू लागला. मुंबई महानगरपालिकेने याबाबतची माहिती दिली. (Mumbai Tulsi Lake Overflow)

तुळशी तलाव हा बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करत असून तो पालिका क्षेत्रात येतो. या तलावाची क्षमता 8046 दशलक्ष लीटर इतकी आहे. हा तलाव गेल्यावर्षी 12 जुलैला भरला होता. तर त्याआधी 9 जुलै 2018, 14 ऑगस्ट 2017 रोजी ओसंडून वाहू लागला होता.

मुंबई महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी तुळशी तलाव हा सर्वात लहान तलाव आहे. यातून दररोज सरासरी 18 दशलक्ष लीटर (१.८ कोटी लीटर) एवढ्या पाण्‍याचा पुरवठा केला जातो. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

तुळशी तलावाबाबत काही माहिती

  • बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे 35 किलोमीटर (सुमारे 22 मैल) अंतरावर हा तलाव आहे.
  • या कृत्रिम तलावाचे बांधकाम 1879 मध्ये पूर्ण झाले.
  • या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे 40 लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.
  • या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.76 किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 1.35 चौरस किलोमीटर एवढे असते.
  • तलाव पूर्ण भरलेला असताना तलावाचा उपयुक्‍त पाणीसाठा हा 804.6 कोटी लीटर एवढा असतो. (8046 दशलक्ष लीटर)
  • हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे विहार तलावाला जाऊन मिळते. (Mumbai Tulsi Lake Overflow)

संबंधित बातम्या :

मुंबईत अवघ्या 30 लाखात घर, ठाकरे सरकारची योजना, ऑक्टोबरमध्ये भूमीपूजन?

इमारतीचा पुनर्विकास तीन वर्षात न केल्यास ‘एनओसी’ रद्द, ठाकरे सरकार दणका देण्याच्या तयारीत

Non Stop LIVE Update
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.