आता मुंबईकर वाचवणार मुंबईकरांचा जीव, महापालिकेकडून नागरिकांना विशेष प्रशिक्षण

नागरिकांना इतर लोकांचा जीव कसा वाचवता येईल याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

आता मुंबईकर वाचवणार मुंबईकरांचा जीव, महापालिकेकडून नागरिकांना विशेष प्रशिक्षण
Follow us
| Updated on: Nov 12, 2020 | 11:03 AM

मुंबई : जागतिक दर्जाच्या मुंबई शहरात (Mumbai City) मोठ्या प्रमाणात आग लागण्याच्या घटनांमुळे आणि इमारती, घरे कोसळून (Building and house collapse) दरवर्षी शेकडो लोकांचे बळी जातात. हे बळी जाऊ नयेत म्हणून मुंबई महापालिका (BMC) दुर्घटना घडण्याची ठिकाणे आणि आग लागू शकते अशा ठिकाणांचे हजार्ड मॅपिंग म्हणजेच सर्व्हे करणार आहे. तसंच अशा विभागांमधील नागरिकांना इतर लोकांचा जीव कसा वाचवता येईल याबाबतचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी (Additional Commissioner Suresh Kakani) यांनी दिली. (Mumbaikars will save Mumbaikars special training for citizens by Mumbai Municipal Corporation)

मुंबईत दरवर्षी आगी लागण्याच्या हजारो घटना घडतात. इमारती घरे दरडी कोसळतात. कोसळणाऱ्या बहुतेक इमारती या धोकादायक झालेल्या असतात. अशा विभागाचा आणि इमारतींचा सर्व्हे करण्याचे आदेश पालिकेच्या 24 विभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत. ज्या ठिकाणी आगी लागण्याच्या, घरे इमारती आणि दरडी कोसळण्याची शक्यता आहे त्याची यादी व अहवाल बनवून पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयात जतन केला जाणार आहे.

‘अडकलेल्या लोकांची सुटका कशी करावी याचे प्रशिक्षण’

यामुळे कोणती दुर्घटना घडल्यास त्याविभागाची इत्यंभूत माहिती पालिकेकडे आणि अग्निशमन दलाकडे असणार आहे. यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याठिकाणी त्वरित मदत कार्य पोहचवणे शक्य होणार असल्याचे काकाणी यांनी सांगितले. आगी लागल्यावर, घरे, इमारती, दरडी कोसळल्यावर त्यात अनेक जण अडकून पडतात. काही लोकांचा जीवही जातो. अशा लोकांना आगीच्या ठिकाणाहून बाहेर पडण्याचे, एखादी इमारत, दरड, घर कोसळल्यावर त्यात अडकलेल्या लोकांची सुटका कशी करावी याचे प्रशिक्षण नागरिकांना दिले जाणार आहे.

या प्रशिक्षणामुळे अग्निशमन दल घटनास्थळी पोहचेपर्यंत घटनास्थळा जवळील नागरिक अडकलेल्या लोकांचा जीव वाचवू शकतील असे काकाणी यांनी सांगितले. सध्या कोरोनाच्या कामात पालिका कर्मचारी व्यस्थ आहेत. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर हा सर्व्हे करून नागरिकांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याचेही काकाणी यांनी सांगितले. (Mumbaikars will save Mumbaikars special training for citizens by Mumbai Municipal Corporation)

आगीमुळे शेकडो मृत्यू 2012 ते 2018 पर्यंत मुंबईत 29140 आग लागण्याच्या घटना झाल्या. त्यात एकूण 300 लोकांचा मृत्यू झाला. या घटनांनमध्ये एकूण 925 लोक जखमी झाले तर एकूण 120 अग्निशमन दलाचे अधिकारी, कर्मचारी जखमी झाले आहेत. जानेवारी ते डिसेंबर 2018 या वर्षात एकूण 4899 आग लागण्याच्या दुर्घटना झाल्या आहे. त्यात 151 गगनचुंबी इमारतीत आग लागली आहे. तसेच 386 व्यासायिक, 969 रहिवाशी इमारती, 544 झोपडपाट्यामध्ये तसेच 2849 अन्य ठिकाणी आगी लागल्या आहेत.

सर्वात जास्त तब्बल 3195 आग लागण्याचे कारण शोर्टसर्किट आहे. तब्बल 111 आग गॅस सिलिंडर लिकेजमुळे लागली आहे. यामध्ये तब्बल 1593 आग अन्य कारणामुळे लागली आहे. तसेच एकूण 52 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यात 36 पुरुष व 11 स्त्री आणि 5 मुलांचा समावेश आहे.

इतर बातम्या –

मुंबई महापालिका निवडणुकीत ‘बिहार पॅटर्न’?, शेलारांचे संकेत; शिवसेनेसाठी धोक्याची घंटा

मुंबई महापालिका नगरसेवकांच्या ‘प्रगती पुस्तकात’ घसरण! पहिल्या दहामध्ये शिवसेनेचे फक्त दोनच नगरसेवक

(Mumbaikars will save Mumbaikars special training for citizens by Mumbai Municipal Corporation)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.