EXCLUSIVE : शरद पवार की बाळासाहेब ठाकरे, आदर्श कोण? : सचिन अहिर यांचं उत्तर..

राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून शिवसेनेत दाखल झालेले माजी मंत्री सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी आज टीव्ही 9 मराठीच्या न्यूजरुम स्ट्राईक कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी सचिन अहिर  (Sachin Ahir) यांनी राष्ट्रवादी का सोडली?

EXCLUSIVE : शरद पवार की बाळासाहेब ठाकरे, आदर्श कोण? : सचिन अहिर यांचं उत्तर..
Follow us
| Updated on: Jul 26, 2019 | 3:45 PM

मुंबई : राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून शिवसेनेत दाखल झालेले माजी मंत्री सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी आज टीव्ही 9 मराठीच्या न्यूजरुम स्ट्राईक कार्यक्रमात हजेरी लावली. यावेळी सचिन अहिर  (Sachin Ahir) यांनी राष्ट्रवादी का सोडली? शिवसेनेतच प्रवेश का केला? वरळी विधानसभेचा वाद कसा मिटवणार? शरद पवारांसाठी संदेश काय? याबाबतच्या सर्व प्रश्नांना मनमोकळी उत्तरं दिली?

शरद पवार की बाळासाहेब ठाकरे?

राजकारणातील आदर्श कोण? शरद पवार की बाळासाहेब ठाकरे, यापैकी एकाची निवड करायची झाल्यास कोणाची कराल असा प्रश्न सचिन अहिर यांना विचारण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले, “निश्चितपणे मनात कोणताही किंतू-परंतु नाही, शरद पवार हे  माझ्या हृदयात आहेत. तेच माझे आदर्श असतील. त्यांचा आशीर्वाद काल होता, आजही आहे, उद्याही ठेवा”

रॅपिड फायरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न

प्रश्न – उद्धव ठाकरे की अजित पवार

उत्तर – उद्धव ठाकरे

प्रश्न – आदित्य ठाकरे की राज ठाकरे

उत्तर – आदित्य ठाकरे

प्रश्न – वरळी की भायखळा

उत्तर – वरळी

शरद पवारांना काय सांगाल?

शरद पवार कुठं भेटले तर हात जोडून माफी मागेन, तेही मला हसून माफ करतील. माझ्या पाठीवर थाप देतील, असा विश्वास सचिन अहिर यांनी व्यक्त केला.

शिवसेनेत प्रवेश कसा झाला?

केवळ सत्तेसाठी मी शिवसेनेत आलो हा आरोप करणं योग्य ठरणार नाही. तसं असतं तर 2014 मध्येच माझ्यासमोर हा पर्याय होता. राष्ट्रवादीला अडचणीच्या काळात मी सोडलं नाही. राष्ट्रवादी टिकवण्याचं काम मी केलं. पण कार्यकर्त्यांची कामं करायची असतील, तर राजकीय निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळेच शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचं संघटन चांगलं आहे. शिवसेनेचं काम मी लहानपणापासून पाहात आलेलो आहे, त्यामुळे शिवसेना जवळची वाटली असं सचिन अहिर म्हणाले.

आदित्य ठाकरेंसोबतच्या चॅटिंगने सेना प्रवेशाचा मार्ग

आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभेतून लढणार असल्याची चर्चा सुरु होती, त्यावेळी मी आदित्य ठाकरेंना व्हॉट्सअॅपवर मेसेज केला. तुमच्याविरुद्ध लढण्यास मजा येईल, असा तो मेसेज होता. त्या मेसेजनंतर संवाद वाढत गेला आणि शिवसेना प्रवेशाचा मार्ग तयार झाला, असं सचिन अहिर यांनी सांगितलं.

आदित्य ठाकरेंनी वरळीतून लढावं

आदित्य ठाकरे जर निवडणुकीत उतरणार असतील तर त्यांनी वरळी मतदारसंघातून लढावं. आम्ही त्यांना प्रचंड मतांनी जिंकून आणू, अशी इच्छा सचिन अहिर यांनी व्यक्त केली. आदित्य ठाकरे हे निवडणूक लढतील की नाही याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाल्याची माहिती आपल्याला नसल्याचंही ते म्हणाले.

युती विरुद्ध आघाडी

आगामी विधानसभा निवडणूक ही मागच्या 2014 च्या निवडणुकीप्रमाणे सर्व पक्षांमध्ये होणार नाही. यावेळी युती विरुद्ध आघाडी अशीच होईल, असं त्यांनी नमूद केलं.

कार्यकर्त्यांची समजूत काढू

सचिन अहिर शिवसेनेत गेल्याने वरळी-बीडीडीतील अनेक कार्यकर्ते नाराज आहेत, त्यामुळे त्यांची समजूत कशी काढणार असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “अनेक कार्यकर्त्यांनी माझ्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. पण निश्चितच काही कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांची मी जरुर समजूत काढेन. माझे स्थानिक कार्यकर्ते जाऊन त्यांची भेट घेतील.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.