ईडी भेट रद्द, शरद पवारांनी सांगितलेली 2 कारणे

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar cancels appearance at ED office) यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी, पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तूर्तास तहकूब केला.

ईडी भेट रद्द, शरद पवारांनी सांगितलेली 2 कारणे

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar cancels appearance at ED office) यांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी, पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तूर्तास तहकूब केला. खुद्द पवारांनी (Sharad Pawar cancels appearance at ED office) माध्यमांना याबाबतची माहिती दिली. कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी म्हणून मी ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब करतोय, असं पवार म्हणाले.

शरद पवारांनी सांगितलेली दोन कारणे

1) कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी

शरद पवार म्हणाले मी स्वत: गृहमंत्री म्हणून काम केलेलं आहे. महाराष्ट्रात संतापाची लाट आहे, त्याची प्रतिक्रिया जिल्ह्याजिल्ह्यात दिसत आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिकट अवस्था निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पोलीस आयुक्तांच्या विनंतीनंतर ईडी कार्यालयात जाण्याचा निर्णय तूर्तास तहकूब करतोय, असं शरद पवार म्हणाले.

  2) माझ्यामुळे सामान्य माणसाला त्रास नको

महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. शहराशहरात-जिल्ह्यात संताप आहे. मुंबईत येणाऱ्यांना बाहेरच अडवलं जातंय, अशा तक्रारी आहेत. आयुक्तांनी विनंती केली की या सर्व पार्श्वभूमीवर मुंबईत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मी  स्वत: राज्यात अनेकदा गृहखातं सांभाळलं आहे. माझ्या एखाद्या कृतीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये. सामान्य माणसाला त्याची किंमत मोजण्याची वेळ यावी हे मला मंजूर नाही. त्यामुळे आता तूर्तास ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब करतोय.

संबंधित बातम्या 

Sharad Pawar ED LIVE : शरद पवारांकडून निर्णय मागे, ईडी कार्यालयात जाणार नाहीत   

पवारांवर गुन्हा चुकीचा, संजय राऊतांची प्रतिक्रिया, आव्हाड म्हणाले थँक्यू!  

शरद पवारांकडून प्रशासन, अधिकाऱ्यांचं कौतुक, सकाळी- सकाळी फोन, पवार उद्या पूरग्रस्त भागात 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *